परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ; फरार आरोपी घोषीत करण्याची कोर्टात मागणी | Parambir singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parambir Singh

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ; फरार आरोपी घोषीत करण्याची कोर्टात मागणी

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : खंडणीचा गुन्हा दाखल झालेले माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह (Parambir singh) यांच्यासह तिघांना फरार आरोपी (Absconding Accused) म्हणून घोषित करण्याची मागणी (demand application) करणारा अर्ज मुंबई पोलिसांनी (Mumbai police) आज महानगर दंडाधिकारी न्यायालयात (court) केला. यामुळे सिंह यांच्या अडचणीत भर पडली आहे.

हेही वाचा: गडचिरोलीत पोलिसांनी केलेली कारवाई ऐतिहासिक - गृहमंत्री वळसे पाटील

गोरेगाव पोलीस ठाण्यात सिंह, विनय सिंह आणि गॅंगस्टर छोटा शकिलचा साथीदार रियाज भट्टी, बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात देखिल सिंह यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल आहे. यापूर्वी पोलिसांनी त्यांना समन्स बजावले होते आणि न्यायालयाने देखील अजामीनपात्र वौरंट जारी केले आहे. मात्र तरीही पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा सापडलेला नाही. त्यामुळे आज सुट्टीकालीन न्यायालयात पोलिसांनी सिंह आणि अन्य दोन आरोपींना फरार म्हणून घोषित करण्याची कारवाई सुरू करण्याची मागणी केली आहे. सिंह यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाईची मागणीही यामध्ये आहे.

नियमित न्यायालयात सोमवारी हा अर्ज दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले. त्यामुळे सोमवारी यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. फौजदारी दंड संहितेच्या कलम 83 नुसार हा अर्ज करण्यात आला आहे. यानुसार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने सरकारी वकील शेखर जगताप यांनी बाजू मांडली. पोलिसांनी सिंह यांना त्यांच्या मलबार हिल निवासस्थानी शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच चंदीगड येथेही हुडकले आहे, असे यापूर्वी अन्य एका सुनावणीमध्ये सांगण्यात आले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर खंडणीचे जाहीर आरोप सिंह यांनी केले आहेत. चालू वर्षी मेमध्ये त्यांनी प्रक्रुतीच्या कारणावरून सुट्टी घेतली होती. त्यानंतर त्यांनी नव्या कामाचा पदभार घेतला नाही. सध्या मुंबई आणि ठाण्यात त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल आहेत आणि तीन अजामीनपात्र वॉरंट न्यायालयाने बजावली आहेत. तसेच चांदीवाल आयोगाने देखील त्यांना चारवेळा समन्स बजावले आहे.

loading image
go to top