esakal | परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्या; बुकींनी केले आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

parambir-singh.jpg

परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्या; बुकींनी केले आरोप

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात पोलिस अधिकारी अनुप डांगे आणि बी.आर. घाडगे यांनी तक्रारी केल्यानंतर आता एका क्रिकेट बुकीने परमबीर सिंग यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी आपल्याकडून जवळपास तीन कोटी 45 लाख रुपये उकळल्याचा आरोप या क्रिकेट बुकीने केला. सोनू जालन असं या क्रिकेट बुकीचं नाव असून यापूर्वी सट्टेबाजीच्या प्रकरणांमध्ये सोनूला जालन्याला अटक झाली होती. सोनू जालनने गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना लिहिलेल्या एक पत्रांमध्ये हा धक्कादायक खुलासा केला आहे.

हेही वाचा: परमबीर सिंह यांची चौकशी करण्यास पोलीस महासंचालकांचा नकार

2018 मध्ये परमबीर सिंग यांनी माझ्यावर मोक्का लावून माझ्याकडून 3 कोटी 45 लाख रुपयांची खंडणी वसूल केली. याशिवाय माजी पोलिस अधिकारी आणि ठाण्यातील एक पोलिस अधिकारी यांच्यावरही क्रिकेट बुकी सोनू जालनने आरोप केले. या प्रकरणाची दखल गृह खात्याने तात्काळ घेतली असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्य गुप्तवार्ता विभागाला (एनसआयडी) देण्यात आले आहेत. सोनू जालानसोबतच केतन टन्ना, मुनीर खान अशा अनेक लोकांनी परमबीर सिंग यांच्यावर कोट्यावधी रुपये उकळल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा: "आघाडीवाल्यांनो, तुमचं म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना"

दुसरीकडे, मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाल्यानंतर पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी परबीर सिंग यांच्याविरोधातील चौकशी करणार नसल्याचे गृहविभागाला कळवले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सिंग यांनी कोर्टातही धाव घेतली होती. त्यांनी CBI कडेही लेखी तक्रारही केली आहे. त्यासाठी परमबीर सिंग यांनी त्यांचे पांडे यांच्यासोबत झालेले संभाषणही या तक्रारीत जोडले आहे. WhatsApp व फोनवरील हे संभाषण आहे. त्यामुळे कोरोना काळातही राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दोनही बाजूंनी आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. तशातच, महासंचालकांनी चौकशीला नकार दिल्यानंतर एसआयडीमार्फत चौकशी करण्यात येऊ शकते असं बोललं जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी काय आरोप होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(संपादन- विराज भागवत)

loading image