esakal | पोलिस आयुक्त परमबीर सिंह येताच... ‘या’कारवाईला स्थगिती!
sakal

बोलून बातमी शोधा

परमबीर सिंह येताच...‘या’कारवाईला स्थगिती!

पोलिस आयुक्त असताना संजय बर्वे यांनी शिस्तभंगाची कारवाई म्हणून या १२ अधिकाऱ्यांची वेतनवाढ एक वर्षासाठी का रोखू नये, अशी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. विद्यमान पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी बर्वे यांच्या निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी या कारवाईला स्थगिती दिली आहे.

पोलिस आयुक्त परमबीर सिंह येताच... ‘या’कारवाईला स्थगिती!

sakal_logo
By
Paramir Singh adjourns Mumbai Police Commissioner Sanjay Barve's action

मुंबई : संजय बर्वे मुंबईचे पोलिस आयुक्त असताना १२ अधिकाऱ्यांनी परस्पर दहशतवादविरोधी पथकात (एटीएस) नियुक्तीसाठी पोलिस महासंचालकांकडे अर्ज केला होता. त्यावर बर्वे यांनी शिस्तभंगाची कारवाई म्हणून या १२ अधिकाऱ्यांची वेतनवाढ एक वर्षासाठी का रोखू नये, अशी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. विद्यमान पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी बर्वे यांच्या निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी या कारवाईला स्थगिती दिली आहे. भविष्यात असे वर्तन होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचा आदेशही त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिला आहे.

ही बातमी वाचली का? सिडकोच्या कामांमधील अनियमितता, फडणवीसांचा पाय खोलात? वाचा कॅगचा रिपोर्ट

संजय बर्वे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली, त्या काळात तत्कालीन सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांची दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली होती. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळावी, म्हणून १२ पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त बर्वे यांना डावलून महासंचालकांकडे परस्पर अर्ज केले होते. हे अर्ज मुंबई पोलिस दलाच्या शिस्तबद्ध प्रतिमेच्या विपरित असल्याचा ठपका ठेवत बर्वे यांनी संबंधित १२ जणांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आणि एक वर्ष वेतनवाढ रोखण्याचा आदेशही दिला होता. आयुक्तांच्या कडक पवित्र्यामुळे मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली होती.

ही बातमी वाचली का? कोरोनामुळे तब्बल 40 दिवसांनी घरी आलं पार्थिव

या अधिकाऱ्यांचा समावेश
या १२ पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेत असताना गुन्हेगारांवर वचक ठेवला होता. त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांत यशस्वी तपास करून आरोपींना बेड्या घातल्या होत्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन अलकनुरे, दिनेश कदम, पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, ज्ञानेश्‍वर वाघ, दया नायक, सुधीर दळवी, सहायक पोलिस निरीक्षक दीप बने, विशाल गायकवाड, दीपाली कुलकर्णी, लक्ष्मीकांत साळुंखे, विल्सन रॉड्रिग्स, अश्‍विनी कोळी अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत.