

Parel-Chinchpokli Clash
ESakal
मुंबई : मुंबईतील परळ-चिंचपोकळीत ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये मोठा वाद निर्माण झाल्याची घटना घडली आहे. धार्मिक घोषणाबाजी आणि पोस्टर्स फाडल्यामुळे दोन गटांमध्ये मोठा वाद झाला असून यावेळी धक्काबुक्की, बाचाबाची तसेच दगडफेक झाल्याची घटना घडली. या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण आणले. मात्र या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.