कोकण भवनसमोर पार्किंगचा पेच 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

नवी मुंबई - मिनी मंत्रालय म्हणून संपूर्ण ठाणे व रायगड जिल्ह्यात परिचित असलेल्या सीबीडी-बेलापूर येथील कोकण भवन इमारतीमध्ये येणाऱ्या नागरिकांना पार्किंगचा प्रश्‍न भेडसावत आहे. पालघर ते सिंधुदुर्गपर्यंतच्या कोकण विभागाचा महसुली कारभार पाहणाऱ्या कोकण भवनच्या प्रशासनाकडे पार्किंगबाबत धोरण नसल्याने कोकण भवन प्रशासनाने बाहेरील वाहनांना आत प्रवेश देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे दूरवरून वाहनांतून भवनात येणाऱ्या अभ्यागतांना वाहने उभी करण्याकरिता जागा शोधावी लागत आहे. 

नवी मुंबई - मिनी मंत्रालय म्हणून संपूर्ण ठाणे व रायगड जिल्ह्यात परिचित असलेल्या सीबीडी-बेलापूर येथील कोकण भवन इमारतीमध्ये येणाऱ्या नागरिकांना पार्किंगचा प्रश्‍न भेडसावत आहे. पालघर ते सिंधुदुर्गपर्यंतच्या कोकण विभागाचा महसुली कारभार पाहणाऱ्या कोकण भवनच्या प्रशासनाकडे पार्किंगबाबत धोरण नसल्याने कोकण भवन प्रशासनाने बाहेरील वाहनांना आत प्रवेश देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे दूरवरून वाहनांतून भवनात येणाऱ्या अभ्यागतांना वाहने उभी करण्याकरिता जागा शोधावी लागत आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

सिडको भवनच्या अगदी शेजारच्या भूखंडांवर विस्तारलेल्या कोकण भवनमध्ये राज्य सरकारच्या मंत्रालयातील सर्व विभागांच्या उपविभागीय कार्यालयांचे कामकाज चालते. कोकण आयुक्त, जिल्हा माहिती कार्यालय, जातपडताळणी, समाजविकास, सहकार खाते, ग्रामविकास यांसारखी सर्व सरकारी विभागांच्या कार्यालयांचा कारभार येथून हाकला जातो. त्याकरिता मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात अनेक सामान्य नागरिकांपासून राजकीय आणि सामाजिक अशा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची कोकण भवनातील कार्यालयांमध्ये रोजची ये-जा सुरू असते; परंतु त्यांची वाहने उभी करण्यासाठी जागेची तरतूद अद्याप करण्यात आलेली नाही. कोकण भवन इमारतीच्या आवारात जागेअभावी रोज वाहतूक कोंडी होत असल्याने बाहेरील वाहनांना प्रशासनाने बंदी केली; तर शेजारच्या भूखंडांवर पार्किंग करू देत नसल्याने त्यावर फेरीवाल्यांनी कब्जा केला होता. मात्र सिडकोने भूखंडाच्या प्रवेशद्वारावर मोठी भिंत घालून "रोगापेक्षा उपाय भयंकर' असा काहीसा फेरीवाल्यांचा बंदोबस्त केला. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून हा भूखंड वापराविना पडून आहे. एकीकडे प्रवेश बंद; तर दुसरीकडे पार्किंगसाठी असलेल्या भूखंडाची वाट बंद केल्याने दूरवरून वाहनाने आलेल्या नागरिकांना प्रथम वाहने उभी करण्यासाठी जागेची शोधाशोध करावी लागत आहे. मग जागेच्या शोधात अगदी आग्रोळी गावाच्या तलावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व कोकण भवन इमारतीच्या मागील रस्त्यावर वाहने उभी केली जात आहेत. कोकण भवन परिसरात रोज संध्याकाळी होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे सुटसुटीत आणि मोकळे रस्ते, मोकळ्या जागा यासाठी प्रसिद्ध असलेल्या महापालिका व सिडकोचे कामकाज फोल ठरलेले दिसते. 

सरकारी दिरंगाईचा फटका 
कोकण भवनसमोर सिडकोचा एक मोठा भूखंड पार्किंगसाठी आरक्षित आहे. तो भूखंड पालिकेने स्वतःकडे हस्तांतर करण्यासाठी सिडकोकडे पाठपुरावाही केला आहे; मात्र सिडकोकडून सुरू असलेल्या संथ कारभारामुळे अद्याप या भूखंडांचा पालिकेसोबतचा करार होऊ शकलेला नाही. त्यामुळे पार्किंगसाठी भूखंड उपलब्ध असतानाही फक्त दिरंगाईमुळे येणाऱ्या अभ्यागतांना त्रास सोसावा लागत आहे. 

कोकण भवनमध्ये एकाच द्वारातून आत-बाहेर 
कोकण भवन इमारतीच्या कुंपणाला तीन प्रवेशद्वारे आहेत. त्यापैकी सिडको भवनसमोरील मुख्य प्रवेशद्वारातून सरकारी वाहनांना प्रवेश दिला जातो; तर याच प्रवेशद्वारातून आतून वाहने बाहेर सोडली जातात. उर्वरित पाठीमागील दोन प्रवेशद्वारे जणू शोभेसाठीच आहेत. त्यामुळे कार्यालये सुटण्याच्या वेळी एकाच गेटमधून सर्व वाहने सुटल्याने रस्त्यावर वाहतूक खोळंबा होत आहे. 

कोकण भवन प्रशासनाकडे पार्किंगच्या धोरणाबाबत विचार सुरू आहे. विचार सुरू असणे हेच एक धोरण आहे. 
- महेंद्र वारभुवन, उपायुक्त, प्रशासन, कोकण भवन 

Web Title: Parking issue Konkan building