माथाडी भवनाला पार्किंगचा विळखा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

नवी मुंबई - वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येणाऱ्या शेकडो अवजड वाहनांसाठी पार्किंगची पुरेशी सोय नसल्यामुळे येथील पार्किंग समस्या दिवसागणिक गंभीर होत आहे. माथाडी भवन येथील पार्किंगची समस्या अधिक जटिल बनली आहे. या परिसराला तिन्ही बाजूंनी पार्किंगचा विळखा पडला आहे. 

माथाडी भवनमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्‍स आहे. तिथे घाऊक व्यवसाय केला जातो. त्यामुळे येथे ग्राहकांची गर्दी असते. समोरच दाणा बाजार आहे. माथाडी भवनच्या तिन्ही बाजूंना "नो पार्किंग' असूनही तेथे मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जातात. 

रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्यामुळे या भागात वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवते. हा रस्ता तुर्भे, वाशी, सानपाडा या मुख्य रस्त्यांना जोडलेला आहे. जवळच मसाला बाजारही आहे. त्यामुळे या तिथेही वाहनांची वर्दळ असते. मुख्य चौकाशेजारी वाहने उभी केल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. या ठिकाणी दुहेरी पार्किंग केले जाते. येथे एकेरी पार्किंगवर कारवाई केली जात नाही; मात्र दुहेरी पार्किंग केल्यास कारवाई केली जाते, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. 

अवजड वाहने रस्त्यावर 
एपीएमसी बाजारात दररोज हजारो अवजड वाहने ये-जा करतात. वाहनतळ नसल्याने ती रस्त्यावरच उभी केली जातात. एपीएमसी बाजारात ट्रक टर्मिनल आहे; परंतु तेही अपुरे पडते. इतर वाहनांच्या पार्किंगसाठी वाहनतळ नसल्याने या ठिकाणी येणारी दुचाकी, चार चाकी वाहने रस्त्यांच्या दुतर्फा उभी केली जातात. त्यामुळे या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होते. 

Web Title: parking issue for Mathadi Bhawan