कर्जतकरांचा श्‍वास कोंडला!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

कर्जत : कर्जत शहरातील कपालेश्वर मंदिर ते उपजिल्हा रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर फेरीवाले, हातगाडीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. बेकायदा फेरीवाले आणि हातगाडीवाल्यांमुळे या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे.

मोठी बातमी : राजकीय निवडणुका कोरोनाच्‍या सावटाखाली? 

कर्जत : कर्जत शहरातील कपालेश्वर मंदिर ते उपजिल्हा रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर फेरीवाले, हातगाडीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे या रस्त्यावर पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. बेकायदा फेरीवाले आणि हातगाडीवाल्यांमुळे या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे.

मोठी बातमी : राजकीय निवडणुका कोरोनाच्‍या सावटाखाली? 

कपालेश्वर मंदिर ते उपजिल्हा रुग्णालयाकडे जाणारा रस्ता बाजारपेठेला जोडणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनचालकांसह पादचाऱ्यांची वर्दळ असते. याचीच दखल घेत 2006 मध्ये रस्तारुंदीकरणासाठी प्रभागाचे तत्कालीन नगरसेवक बळवंत घुमरे यांनी पुढाकार घेऊन रुंदीकरणाला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवले होते. त्यानंतर रस्तारुंदीकरण झाले. मात्र काही काळानंतर या रस्त्यावर अनेक भाजीवाले, कटलरी विक्रेते, फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे.

या रस्त्यावरून नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. या रस्त्यावरील अनधिकृत दुकाने हटवावीत, यासाठी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यानी नगरपालिकेला पत्र देऊन रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यावर काहीही कारवाई झालेली नाही.

मोठी बातमी : मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द 

सदर रस्ता हा एकेरी वाहतुकीसाठी आहे आणि तसा फलक सध्या रस्त्याच्या सुरुवातीला लावला आहे. मात्र प्रत्यक्षात काही अंमलबजावणी होताना दिसत नाही. सध्या दोन्ही बाजूने वाहनांची वाहतूक होत आहे. बाजारात वाहन घेऊन येणारे नागरिक रस्त्याच्या कडेला पार्किंगची जागाच नसल्याने चालणे कठीण झाले आहे.

हॉर्न वाजविणाऱ्यांवर कारवाईची मागणी 
फेरीवाल्यांमुळे रस्ते अधिकच अरुंद भासत आहेत. मालवाहतूक पुरवठा करणारे मोठे ट्रक रस्त्यात उभे करत असल्याने वाहतूक कोंडी होते आणि रस्ता अडवल्यामुळे या वाहनामागील चालक कर्कश हॉर्न वाजवतच राहतात. त्यामुळे ध्वनिप्रदूषण होते. ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होतो. याकडे कर्जत नगर परिषद प्रशासनाने विशेष लक्ष घालून योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते समीर सोहोनी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

कर्जत नगरपालिका आणि वाहतूक पोलिस प्रशासन यांच्या मदतीने वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निकाली काढून नागरिकांना रस्ता खुला करून देऊ. 
- पंकज पाटील, मुख्याधिकारी, कर्जत नगरपालिका  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parking problems in Karjat