उत्कृष्ट संसदपटू व भाषण पुरस्कार जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 19 मे 2018

मुंबई - विधानमंडळात जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी 2015 ते 2018 या कालावधीत सातत्याने प्रयत्नशील असलेल्या सहा आमदारांना उत्कृष्ट संसदपटू, तर इतर सहा आमदारांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे हे पुरस्कार दिले जातात. उत्कृष्ट संसदपटूमध्ये आमदार अनिल बोंडे, सुभाष साबणे, राहुल कुल, ऍड. अनिल परब, भाई गिरकर आणि संजय दत्त यांचा समावेश आहे. तसेच प्रा. वर्षा गायकवाड, राजेश टोपे, धैर्यशील पाटील, ऍड. राहुल नार्वेकर, कपिल पाटील आणि प्रवीण दरेकर यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर झाला आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद सभाग्रृहनेते चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, विधान मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आणि ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या समितीने ही निवड केली आहे.
Web Title: parliament player speech award