हत्येच्या आरोपातील दोषींना पॅरोल मंजूर, पण घरातून बाहेर पडता येणार नाही - उच्च न्यायालय

सुमित महामुणकर
Sunday, 20 September 2020

हत्येच्या आरोपात दोषी ठरलेल्या तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त पॅरोल मंजूर केला

मुंबई : ता. 20 : हत्येच्या आरोपात दोषी ठरलेल्या तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त पॅरोल मंजूर केला. आरोपींंनी घरातच रहावे, घराबाहेर पडू नये ते त्यांच्यासाठी आणि समाजासाठी सुरक्षित आहे, असे ही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्याने कारागृहातील गर्दी कमी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत. यामध्ये गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या आरोपींंना पॅरोल मंजूर होऊ शकत नाही, असं स्पष्ट नमूद केले आहे. औरंगाबादमधील हर्सूल कारागृहात असलेल्या आणि हत्येच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या तिघांनी तात्पुरत्या पॅरोलसाठी अर्ज केला होता. कारागृह प्रशासनाने हा अर्ज नामंजूर केला. 

मोठी बातमी - मुंबईत कोरोनाचा दुसरा उद्रेक, शहरात समूह संसर्गाची भीती

याविरोधात त्यांनी ऍडव्होकेट सतेज जाधव आणि ऍडव्होकेट रोहित पटवर्धन यांच्यामार्फत याचिका दाखल केली. याचिकेवर न्या. आर व्ही घुगे आणि न्या. बी व्ही दिबाडवर यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. राज्य सरकारच्या वतीने अर्जाला विरोध करण्यात आला. याआधी आरोपींचे अर्ज नामंजूर झाले आहेत आणि नियमानुसार त्यांना जामीन मिळू शकत नाही असा युक्तिवाद करण्यात आला. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य केला. 

कारागृहे रिकामी करा, असे सरकारचे निर्देश नसून तेथील गर्दी कमी करण्याचे निर्देश आहेत. लॉकडाऊनमध्ये 300 बंदिस्त कैद्यांना जामीन मंजूर झाला. पण नवीन बंदींंच्या येण्यामुळे कारागृहात 1351 बंदी आहेत. ही गर्दी संसर्ग टाळण्यासाठी कमी व्हायला हवी, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. तसेच आरोपींंनी जामीन मंजूर झाला तरी घरातच रहावे आणि घराबाहेर फिरु नये. त्यांच्या आणि समाजाच्या आरोग्यासाठी हे सुरक्षित आहे, असे आदेश दिले आहेत.

मोठी बातमी - उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा - निवडणूक आयोग

दरम्यान ज्या तिघांना पॅरोल मंजूर केलाय त्यांना  दिनांक 25 पासून 45 दिवसांसाठी पॅरोलवर जात येईल.

( संपादन - सुमित बागुल ) 

parole approved by bombay high court but prisoners are allowed to go out of their home


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parole approved by bombay high court but prisoners are allowed to go out of their home