Crime News : पार्ट टाइम जॉबच्या निमित्ताने फसवणूक करणारी राजस्थानी टोळी अटकेत

पार्ट टाइम जॉबच्या निमित्ताने विविध टास्क देत बँक खाते रिकामी करणाऱ्या राजस्थानी टोळीचा माटुंगा पोलीस ठाण्यातील सायबर पथकाने पर्दाफाश
part time job fraud scam with youth Rajasthani gang arrested police mumbai
part time job fraud scam with youth Rajasthani gang arrested police mumbaisakal

मुंबई : पार्ट टाइम जॉबच्या निमित्ताने विविध टास्क देत बँक खाते रिकामी करणाऱ्या राजस्थानी टोळीचा माटुंगा पोलीस ठाण्यातील सायबर पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.सुरत सिंग ,देवीसिंग , विनोदकुमार अगरवाल अशी आरोपींची नावे आहे.या त्रिकुटाने शेकडो जणांना गंडविल्याचा संशय असून त्यांच्याकडून 32 मोबाईल आणि 72 सिमकार्ड जप्त करण्यात आले आहे.

माटुंगा परिसरात राहणाऱ्या सुकन्या सुनिल परब 26 याना 6 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता घरी असताना इंस्टाग्राम अकाउंट आणि अँमेझोनवर पार्ट टाइम जॉबची बनावट जाहिरात पाहून त्यावर क्लिक केले. त्यानंतर अँमेझोन कंपनीतुन बोलत असल्याचे भासवून पार्ट टाइम जॉब बाबत विचारणा केली. सावज जाळ्यात अडकताच, त्यांना एक लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगितले. पुढे बँक खाते लिंक करण्यास भाग पाडले.

पुढे वेगवेगळे टास्क देत त्यांचे बँक खाते रिकामे केल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. माटुंगा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. सायबर पोलिसांनी या प्रकरणी त्वरित तपास सुरू केला तपासात सर्वप्रथम ज्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित झाले होते त्या बँक खात्याचे तपशील सायबर पोलिसांनी तपासले बँकेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना ट्रॅक करायला पोलिसांनी सुरुवात केली. पोलिसांना लोकेशन मिळतात दोन आरोपीं सुरत सिंग आणि देवीसिंगला मुंबईच्या सायन परिसरातून अटक करण्यात आली. या दोघांकडे अधिक तपास केला असता तिसऱ्या आरोपीला विनोदकुमार अगरवालला अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com