Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

Parth Pawar to be sent to Rajya Sabha : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली गेली आहे.
Parth Pawar

Parth Pawar

esakal

Updated on

Parth Pawar Rajya Sabha nomination announced by Praful Patel during NCP meeting : मुंबईमधील वरळी डोम येथे आज (गुरुवार) झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आले. यामध्ये सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवडण्यात आलं. यानंतर पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार असल्याचं जाहीर केलं गेलं.पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल पटेल यांनी या दोन्ही निर्णयांची घोषणा केली.

तत्पुर्वी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जबाबादारी स्वीकारत पक्षाला मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर प्रफुल पटेल यांनी पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याचं सर्वांसमोर जाहीर केलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीस आज पार्थ पवार अनुपस्थि होते.

यावेळी सुनेत्रा पवार मनोगत व्यक्त करताना, अनेकदा भावूक झाल्याचे दिसून आले. त्या म्हणाल्या, महाराष्ट्राचे विकासाचे अजितदादांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. मात्र ते स्वप्न आपण.सर्व जण मिळून पूर्ण करू. 30 जून 23 रोजी अजितदादानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.पक्षाची ताकद तिपटीने वाढवली. दादांच्या काळात महाराष्ट्र लोकसभा, विधानसभा अरुणाचल प्रदेश विधान सभा, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद या सर्व निवडणुकात दमदार कामगिरी केली.

Parth Pawar
Sunetra Pawar: सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष; प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

तसेच आपला पक्ष देशाच्या मातीशी नाते सांगणारा आहे. 27 वर्षाची यशस्वी वाटचाल करत आहे. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला योग्य दिशा देण्याचे काम करायचे आहे. दादांसारख्या वादळासोबत मी 40 वर्ष संसार केलाय, आता तुमच्या सर्वांच्या मेहनतीच्या जोरावर आणि पाठबळावर ही जबाबदारी मी पेलिन. अजितदादांनी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराशी कधीही तडजोड केली नाही, तोच विचार पुढे न्यायचा आहे. पक्ष समाजातील कोणत्याच घटकाला वाऱ्यावर सोडणार नाही. असं यावेळी सुनेत्रा पवार यांनी सांगितलं.

Parth Pawar
Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

याचबरोबर ''प्रत्येक कार्यकर्त्या हा राष्ट्रीयं अध्यक्ष असल्याचे.भावनेने काम करायचं आहे. पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनवायचे आहे. ग्रामीण भागात आपले ताकद आहे आपल्या शहरात पण पक्ष वाढवायचा आहे. महाराष्ट्राचे कल्याण, जनतेचे कल्याण आणि राष्ट्रवादी पक्षाचं विस्तार हेच माझं ध्येय आहे. फक्त जय आणि पार्थ हे माझं कुटुंब नाहीतर राष्ट्रवादी पक्ष हा माझा परिवार. उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही.'' असंही यावेळी सुनेत्रा पवार यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com