Tree Collapse
sakal
मुंबई - गोरेगाव (पश्चिम) येथे २६ वर्षीय गर्भवती महिलेवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. जखमी महिलेवर कूपर रुग्णालयाच्या सर्जिकल अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिच्या खांद्याला, डोक्याला, पाठीला आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर महिलेच्या पतीने पालिकेवर निष्काळजीचा आरोप केला असून हे झाड अर्धवट तोडून ठेवल्याने हा अपघात झाल्याचा दावा केला. तपासण्या आणि सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी गर्भातील बाळ सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले.