Mumbai Marathi: 'मराठीत बोला' म्हणताच प्रवाशी दोन तास RPF कार्यालयात?; पश्चिम रेल्वेविरोधात आंदोलनाचा इशारा, AC लोकलमध्ये वाद..

Committee Demands Action Against Ticket Checkers: एसी लोकलमधील तिकीट तपासणीदरम्यान ‘मराठीत बोला’ म्हणणाऱ्या प्रवाशाला दोन तास आरपीएफ कार्यालयात बसवून ठेवल्याचा आरोप; मराठी एकीकरण समितीकडून पश्चिम रेल्वेकडे जाहीर माफी व दोषींवर कारवाईची मागणी
'Speak in Marathi' Request Triggers Controversy; Protest Threat Issued Against Western Railway

'Speak in Marathi' Request Triggers Controversy; Protest Threat Issued Against Western Railway

esakal

Updated on

-नितीन बिनेकर

मुंबई : महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठीत संवाद साधण्याची मागणी केल्यानंतर एका प्रवाशाला अंधेरी येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) कार्यालयात सुमारे दोन तास बसवून ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप मराठी एकीकरण समितीने केला आहे. धावत्या एसी लोकलमध्ये तिकीट तपासणीदरम्यान घडलेल्या या प्रकारानंतर पश्चिम रेल्वेने जाहीर माफी मागावी, संबंधित तिकीट तपासकांवर गुन्हे दाखल करावेत; अन्यथा बुधवारी रेल्वेविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही समितीने दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com