esakal | एसटीच्या आंतरजिल्हा सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद; लांब पल्ल्याच्या सेवाही लवकरच सुरू होणार
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीच्या आंतरजिल्हा सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद; लांब पल्ल्याच्या सेवाही लवकरच सुरू होणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनमुळे बंद पडलेली एसटीची आंतरजिल्हा एसटी सेवा अखेर गुरुवारपासून राज्यभरात सुरू करण्यात आली.

एसटीच्या आंतरजिल्हा सेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद; लांब पल्ल्याच्या सेवाही लवकरच सुरू होणार

sakal_logo
By
प्रशांत कांबळे


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनमुळे बंद पडलेली एसटीची आंतरजिल्हा एसटी सेवा अखेर गुरुवारपासून राज्यभरात सुरू करण्यात आली. दरम्यान पहिल्याच दिवशीच एसटीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला, तर अनेक मार्गावर प्रवासी नसल्याने फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.

 कोरोनाग्रस्त पित्याच्या मृत्यूचे वृत्त कळताच मुलानेही सोडला प्राण; नवीन पनवेलमधील घटनेने हळहळ

तब्बल पाच महिन्यानंतर गुरुवारी राज्यात एसटीची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. दुपारी 4 वाजेपर्यंत राज्यभरात 840 बसेस द्वारे 1090 फेऱ्या झाल्या. ज्यामध्ये 50 टक्के प्रवासी वाहतूक करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी प्रवासी नसल्याने एसटीच्या अनेक मार्गावरील फेऱ्या रद्द कराव्या लागल्या,त्यामुळे लांब पल्यावरील एसटीच्या उत्पन्नाला फटका बसला आहे. मुंबईतील प्रमुख बस्थानकातुन  सातारा, नाशिक, चिपळून, अलिबाग, पुणे अशा मध्यम लांब पल्ल्यांच्या फेर्‍या सोडण्यात आल्या. मात्र, या फेऱ्यांमध्येही फारसे प्रवासी नव्हते.

मुंबई व ठाण्यातून दिवसाभरात 5 शिवनेरी बसेस पुण्याकडे रवाना झाल्या .त्यातून फक्त 100 प्रवाशांनी प्रवास केला. तर पुण्याहून केवळ एक शिवनेरी मुंबईत दाखल झाली. त्यामध्ये  18 प्रवासी होते. 

स्वच्छ सर्वेक्षणात ठाण्याची गरूड झेप! राज्यात तिसरे तर देशात.... - 

लांब पल्ल्याची सेवा शुक्रवारपासून ?

मुंबई, ठाण्यातून जळगाव ,औरंगाबाद, नांदेड, लातूर ,सोलापूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी  लांब पल्ल्याची बस अथवा रातराणी बस सोडण्यात आली नाही. मात्र या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांनी बस स्थानक व आगारात चौकशी केली. त्यामुळे कदाचित उद्या लांब पल्ल्याच्या बस सोडण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळ प्रशासनाने सांगितले.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top