esakal | कांदिवली येथे रेल्वेची ट्रकला धडक; सुदैवाने मोठा अपघात टळला...
sakal

बोलून बातमी शोधा

train accident

कांदिवली स्टेशनजवळ सहाव्या मार्गिकेचे काम सुरु होते. दरम्यान वांद्रे स्थानकावरून 02925  बीडीटीएस-अमृतसर ही रेल्वे दुपारी 12.30 च्या सुमारास निघाली. यावेळी अचानक एक ट्रक रेल्वेमार्गावर आल्याने धडक दिली.

कांदिवली येथे रेल्वेची ट्रकला धडक; सुदैवाने मोठा अपघात टळला...

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : मुंबईच्या वांद्रे टर्मिनसवरून अमृतसरला जाणाऱ्या एक्सप्रेसचा कांदिवली रेल्वेस्थानकाजवळ मोठा अपघात थोडक्यात टळला. अचानक एक मालवाहू ट्रक रेल्वेमार्गावर आल्याने रेल्वेने ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले, तर ट्रकची मागच्या भागाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी ट्रक चालकाना ताब्यात घेण्यात आले असून कोणाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला, याबाबत  रेल्वेने चौकशीचे आदेश दिले आहेत.

ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, ट्विटरवरुन दिली माहिती

पश्चिम रेल्वेमार्गावर कांदिवली स्टेशनजवळ रेल्वेमार्गावर काम सुरु आहे. यासाठी ट्रकमधून आवश्यक ती मालवाहतूक केली जाते. दुपारी साडेबाराच्या सुमारास आलेल्या रेल्वेने या ट्रकला धडक दिली. ट्रकच्या मागच्या बाजूचे नुकसान झाले, शिवाय रेल्वेच्या धडकेमुळे ट्रक फरफटत गेला, दुभाजकाच्या बॅरिकेटस् तोडून ट्रक पुढे गेला. रेल्वेनेच्या इंजिनच्या पुढच्या बाजूला ट्रकला घासला आहे. सुदैवाने मोठी हानी झालेली नाही. दरम्यान अपघातग्रस्त ट्रक जप्त करण्यात आला असन चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मातोश्रीवर कोरोनाची पुन्हा धडक! तेजस ठाकरे यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाईन...

कांदिवली स्टेशनजवळ सहाव्या मार्गिकेचे काम सुरु होते. दरम्यान वांद्रे स्थानकावरून 02925  बीडीटीएस-अमृतसर ही रेल्वे दुपारी 12.30 च्या सुमारास निघाली. यावेळी अचानक एक ट्रक रेल्वेमार्गावर आल्याने धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाली नसल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. अपघातानंतर दीडच्या सुमारास रेल्वे बोरीवली स्थानकावर नेण्यात आली. तेथे इंजिन बदलल्यानंतर रेल्वे रवाना झाल्याचे पश्चिम रेल्वकडून सांगण्यात आले. रेल्वे मार्गावर ट्रक आला कसा? यामध्ये कुणाचा हलगर्जीपणा आहे का? याबाबत तपास सुरु आहे. त्यासाठी ज्युनिअर अॅडमिनिस्ट्रेटीव्ह ग्रेड दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image
go to top