Mumbai Local: टिटवाळा स्टेशन परिसरात प्रवाशी चाकरमाण्यांचा रेल्वे रोखो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Local

Mumbai Local: टिटवाळा स्टेशन परिसरात प्रवाशी चाकरमाण्यांचा रेल्वे रोखो

मुंबईकडून येणाऱ्या लोकल सतत उशिराने येत असल्याचे सांगत त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी थेट रेल्वे मार्गावर उतरत रेल रोकोचा प्रयत्न केला, तब्बल 15 मिनिट प्रवासी रेल्वे पटरिवर उभे होते . मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात आज सकाळी हा प्रकार घडला.मात्र प्रवासी रेल्वे रुळांवर उतरल्याने गाड्यांचे वेळापत्रक काहीसे कोलमडले आहे.

मुंबईवरून येणारी प्रत्येक लोकल ट्रेन उशिरा येत असल्यामुळे प्रवाशांचा उद्रेक झाला आहे. 15 मिनिट रेल्वे ट्रॅकवर प्रवाशी उतरले असून प्रवाश्यांकडून राग व्यक्त केला जात आहे. मुंबईवरून येणारी लोकल उशिरा येत असल्याने रेल्वे प्रवासी खुप रागात असुन बहुतेक रेल्वे रोको करण्यासाठी पाऊल उचलत आहेत अशी माहिती समोर येत आहे. 8.19 ची लोकल प्रवाश्यांनी थांबवली आहे. प्रवासी रेल्वे पटरीवर उतरले आहेत. मुंबई वरून येणारी प्रत्येक लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत, त्यामुळे हा प्रवाशांचा उद्रेक झाला आहे. सकाळी कामाच्या वेळी लोकल उशिरा येत असल्यामुळे प्रवाश्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मुंबई कडून येणारे व मुंबईला जाणारे लोकल ट्रेन उशिरा येत असल्याने प्रवाशीचा झाला उद्रेक झाला आहे. संतप्त झालेल्या प्रवाश्यांनी रेल्वे पटरीवर उतरून 8.19 ची लोकल थांबवली आहे. रेल्वे पोलीस व रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी पोहचून प्रवश्याना हटवले आहे.

मुंबईकडून येणाऱ्या लोकल गाड्या सतत उशिराने येत असल्याने प्रवाशांना कामावर जायलाही उशिर होत होता. आजही तसाच प्रकार घडल्याने तब्बल 15 ते 20 मिनिट लोकल उशिराने असल्याने प्रवाशांच्या सहनशिलतेचा अंत झाला आणि त्यांनी थेट रेल्वे रुळांवर उतरले.प्रवासी १५ मिनिटांनी रेल्वे रेल्वे रुळावर होते.पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत या प्रवाशांना बाजूला करत रेल्वे वाहतूक पुन्हा सुरु केली आहे.