

Navi Mumbai Unauthorized Parking
ESakal
नेरूळ : स्वच्छ, सुनियोजित आणि आधुनिक शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. नवी मुंबई महानगरपालिका व सिडकोच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे शहराने स्वच्छतेच्या शर्यतीत सातत्याने अव्वल स्थान पटकावले आहे. मात्र, या उजळ प्रतिमेला नेरूळ रेल्वे स्थानक परिसरातील बेवारस, भंगारात निघालेली वाहने आणि अनधिकृत पार्किंग यामुळे गालबोट लागत आहे.