esakal | आंबेत पूल बंद असल्याने द्रविडी प्रणायम 
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेत पूल बंद असल्याने द्रविडी प्रणायम 

महाडजवळील सावित्री पूल दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यानुसार कमकुवत आणि धोकादायक पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याचे काम सरकारने हाती घेतले. त्यामध्ये आंबेत पुलाचाही समावेश आहे. या दुरुस्ती कामासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी तो बंद करण्याचे आदेश दिले होते.

आंबेत पूल बंद असल्याने द्रविडी प्रणायम 

sakal_logo
By
सुनील पाटकर

महाड : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा महाड तालुक्‍यातील सावित्री नदीवरील आंबेत पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना महाडमार्गे 35-40 किलोमीटरचा द्राविडीप्राणायम करावा लागतो. यातून पैशांचाही अपव्यय होत आहे. 

हे वाचा : शाळा सुरू करण्याबाबत दिवाळीनंतर निर्णय

महाडजवळील सावित्री पूल दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यानुसार कमकुवत आणि धोकादायक पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याचे काम सरकारने हाती घेतले. त्यामध्ये आंबेत पुलाचाही समावेश आहे. या दुरुस्ती कामासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी तो बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ऑक्‍टोबर 2019 पासून अवजड वाहतुकीला बंद झालेला होता, परंतु आता 31 जानेवारी 2021 पर्यंत तो सर्वच वाहनांसाठी बंद करण्यात आल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड आणि दापोली तालुक्‍यातील वाहतूक महाड मार्गे सुरू आहे. एसटीच्या तब्बल 40 गाड्या; तर शेकडो व्यापारी वाहने महाडमार्गे जातात. मुंबई-पुण्याकडे प्रवास करण्यासाठी 40 किलोमीटरचा वळसा घालावा लागतो; तर 35 ते 40 रुपये जादा खर्च येतो. 

हे वाचा : वर्वरा राव यांच्या जामिनावर सुनावणी घेण्यास नकार

फेरीबोटीचा पर्याय कागदावरच 
आंबेत पूल बंद झाल्यानंतर फेरीबोटीचा पर्याय पुढे आला होता, परंतु त्यावर अद्यापही कार्यवाही नसल्याने नागरिकांची गैरसोय कायम आहे. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांचे आंबेत हे गाव. त्यांच्या कारकिर्दीमध्येच 80 च्या सुमारास या पुलाचे बांधकाम झाले होते. या पुलापूर्वी व्यापारी वाहतूक करणाऱ्यांना खेड कशेडी घाटमार्गे महाड असा 100 किलोमीटरचा अधिक प्रवास करून मुंबई प्रवास करावा लागत होता. दापोली व मंडणगड या दोन तालुक्‍यांमधील नागरिकांसाठी हा प्रवास मोठा अडचणीचा ठरत होता.