काम बंद; हाल सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

वसई ः वेतनासह अन्य मागण्यांसाठी परिवहन सेवेच्या कामगारांनी बुधवारी (ता. १५) पुकारलेला बंद गुरुवारी (ता. १६) दुसऱ्या दिवशी कायम आहे. दुसऱ्या दिवशीदेखील चर्चेतून सकारात्मक समाधान न झाल्याने संप सुरूच ठेवण्याचा पवित्रा कामगारांनी घेतला आहे. यामुळे प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.https://www.esakal.com/mumbai/20-students-injured-st-bus-accident-252830

वसई ः वेतनासह अन्य मागण्यांसाठी परिवहन सेवेच्या कामगारांनी बुधवारी (ता. १५) पुकारलेला बंद गुरुवारी (ता. १६) दुसऱ्या दिवशी कायम आहे. दुसऱ्या दिवशीदेखील चर्चेतून सकारात्मक समाधान न झाल्याने संप सुरूच ठेवण्याचा पवित्रा कामगारांनी घेतला आहे. यामुळे प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

पालीजवळ एसटी बस अपघातात 20 विद्यार्थी जखमी

वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवा बसमधून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य सेवा देण्यात आली आहे. आजारी रुग्णांनादेखील याचा लाभ मिळत आहे. नागरिकांचा प्रवास सुकर व्हावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत; परंतु बुधवारपासून सुरू असलेल्या संपामुळे बस रस्त्यावर धावत नाही.

कडाक्याच्या थंडीत गेला तोल

तोडगा काढण्यासाठी रात्रभर प्रयत्न झाले; परंतु ते निष्फळ ठरले असून कामगारांनी संप सुरूच ठेवला आहे. वेतन वेळेवर मिळत नसल्याने होणारे हाल, परिश्रम करूनदेखील भविष्य निर्वाह निधीसाठी ठेकेदाराची उदासीनता आणि अन्य मागण्या मान्य होत नसल्याने कोणतीही संघटना पाठीशी न ठेवता सर्व कामगारांनी एकजुटीने हा संप पुकारला आहे.

ठेकेदाराने नोव्हेंबरमध्ये वेळेवर वेतन मिळेल असे लेखी आश्‍वासन दिले; परंतु आजतागायत याबाबत अंमलबजावणी करण्यात न आल्याने कामगार हताश झाले आहेत. याच संतापातून त्यांनी ठेकेदाराविरोधात घोषणा देत मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत बंद करण्याचा इशारा दिला आहे. पालिकेनेदेखील याची गंभीर दखल घेत ठेकेदाराला नोटीस बजावली असून कामगारांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देण्यास सांगितले आहे; परंतु दुपारी १२ वाजेपर्यंत वसई पूर्व डेपो येथे सुरू असलेल्या संपाच्या ठिकाणी कोणीच चर्चेला आले नाही.

गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्त बी. जी. पवार यांच्यासमोर श्रमजीवी रयत संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन सेवेच्या कामगारांची व्यथा मांडण्यात आली; मात्र याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. कामगारांना न्याय मिळावा, प्रशासनाने उदासीन भूमिका घेऊ नये.
पुतळाजी कदम, सचिव, श्रमजीवी कामगार रयत संघटना

आमच्या हक्कासाठी आम्ही लढत आहोत. ठेकेदारांनी लेखी आश्‍वासन देऊनही वेतन मात्र वेळेवर मिळत नाही, सकारात्मक चर्चा घडत नाही. आता आश्‍वासनांची खैरात नको, तर पूर्तता झाली पाहिजे. जोवर मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत बंद राहील. आज दुसऱ्या दिवशीही सर्व कामगार बंदमध्येो सहभागी झाले आहेत.
प्रवीण देवरूखकर, कामगार, परिवहन सेवा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: passengers suffers from Vasai due to transport workers strike.