कळव्यात डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू

hospital
hospital

कळवा : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सोमवारी (ता.4) रात्री साडेअकराच्या सुमारास रुग्णालयातील कामगाराच्या 26 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. मात्र,डॉक्‍टरांनी तपासणीसाठी विलंब केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.

रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र, या घटनेने रुग्णालयातील कामगाराच्या मुलालाच तातडीने उपचार मिळत नसल्याने रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. 

कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात कामगार असलेल्या एका कर्मचाऱ्याचा मुलगा सुमन रोमटे (26) याला छातीत वेदना होत असल्याने त्याला रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. डॉक्‍टरांनी त्याला काही वेळ थांबायला सांगून ते दुसऱ्या रुग्णाच्या तपासणीसाठी गेले. दरम्यान, सुमनला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. उपस्थितांनी डॉक्‍टरांविरोधात हलगर्जीपणाचा आरोप करत गोंधळ घातल्याने रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर, प्रशासनाने पोलिसांना पाचारण करत नातेवाईकांची समजूत काढली. रुग्णालय प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळून लावले. 
---

डॉक्‍टरांनी संबंधित रुग्णांवर उपचार सुरू केले होते; परंतु त्याचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला. नातेवाईकानी डॉक्‍टरांवर केलेला आरोप चुकीचा आहे. 
- डॉ. रुख्मिनी मंजूनाथन, उपअधीक्षक, छत्रपती शिवाजी रुग्णालय, कळवा. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com