पालिका रुग्णालयात आर्थिक भुर्दंड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

तुर्भे - पालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयातील हातमोजे आणि टाके घालण्यासाठी लागणारा धागा आठ दिवसांपासून संपला आहे. त्यामुळे हे साहित्य रुग्णांना बाहेरून विकत आणावे लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. परंतु आठ दिवसांपासून रुग्णालयातील हातमोजे व टाके घालण्याचे धागे संपले असल्याने रुग्णांना ते खासगी औषध दुकानातून आणावे लागत आहेत. हातमोजे घेण्यासाठी २००; तर टाक्‍यांचा धागा ४०० रुपयांना मिळत असल्याने त्याचा आर्थिक भुर्दंड रुग्णांना सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीच्या डोक्‍याला जखम झाली होती. त्याला ४०० रुपये खर्च करून टाक्‍यांसाठी धागा आणावा लागला होता. बुधवारी अशीच घटना ६० वर्षीय महिलेच्या बाबतीत घडली. याबाबत वैद्यकीय अधिकारी दयानंद कटके यांना विचारले असता हातमोजे व टाके टाकण्याच्या धाग्याचा पुरवठा झाला आहे, असे त्यांनी सांगितले. 

Web Title: Patients suffering from bullying in Municipal Hospital

टॅग्स