25 रुपये जादा द्या, मेट्रोकडून भारी गिफ्ट मिळवा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

मुंबई मेट्रो ही संपूर्ण देशभरात सतत चर्चेत असते. दररोज हजारो नागरिक मुंबई मेट्रोने प्रवास करत असतात. सकाळी आणि संध्याकाळी म्हणजेच दैनंदिनद कामकाजाच्या वेळेत मेट्रोमध्ये लोकलपेक्षा जास्त गर्दी बघायला मिळते. मात्र आता मुंबई मेट्रो प्रवाशांना मोठं गिफ्ट देणार आहे. आता प्रवाशांना केवळ अतिरिक्त २५ रुपये देऊन महिनाभर कितीही वेळा म्हणजेच अनलिमिटेड प्रवास करता येणार आहे. त्यामुळे आता मेट्रोने रोज प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर मेट्रो प्रशासनाकडून येताना पाहायला मिळतेय. 

मुंबई  - मुंबई मेट्रो ही संपूर्ण देशभरात सतत चर्चेत असते. दररोज हजारो नागरिक मुंबई मेट्रोने प्रवास करत असतात. सकाळी आणि संध्याकाळी म्हणजेच दैनंदिनद कामकाजाच्या वेळेत मेट्रोमध्ये लोकलपेक्षा जास्त गर्दी बघायला मिळते. मात्र आता मुंबई मेट्रो प्रवाशांना मोठं गिफ्ट देणार आहे. आता प्रवाशांना केवळ अतिरिक्त २५ रुपये देऊन महिनाभर कितीही वेळा म्हणजेच अनलिमिटेड प्रवास करता येणार आहे. त्यामुळे आता मेट्रोने रोज प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर मेट्रो प्रशासनाकडून येताना पाहायला मिळतेय. 

Inside Story - जाणून घ्या कसं केलं जातं 'फोन टॅपिंग' किंवा 'स्नूपिंग'

घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो-१ दरम्यान मेट्रोमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. सकाळी आणि संध्याकाळी मेट्रोमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. ऑफिस आणि कॉलेजचे विद्यार्थी दररोज मेट्रोने प्रवास करत असतात. मात्र अवघ्या ४५ फेऱ्यांसाठी प्रवाशांना तब्बल ७७५ ते १३७५ रुपये खर्च करावे लागत होते. मात्र आता मेट्रो प्रवासी आता महिनाभरात अमर्यादित फेऱ्या करू शकणार आहेत. विशेष म्हणजे प्रवाशांना या अमर्यादित फेऱ्या पासच्या रकमेच्या अतिरिक्त २५ रुपये भरून  करता येणार आहेत. मेट्रो प्रशासनाच्या या निर्णयामुळे मेट्रोने दररोज प्रवास प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 

मोठी बातमी- "राज ठाकरे यांच्या हिंदुत्वामागे शरद पवार यांचं डोकं"

घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रोच्या मार्गांवर मरोळ, अंधेरी, साकीनाका, डी. एन. नगर, या भागांमध्ये अनेक ऑफिसेस आणि कॉलेज आहेत. त्यामुळे या मार्गावर  प्रचंड गर्दी होत असते. या आधीही मुंबई मेट्रो वाजवीपेक्षा जास्त  भाड्यामुळे वादात राहिली आहे. मात्र आता मेट्रोच्या या निर्णयामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे.   

pay extra 25 rupees and  get unlimited rides on mumbai metro


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pay extra 25 rupees and get unlimited rides on mumbai metro