BHIM वापरून GST भरा आणि मिळवा २० टक्के कॅशबॅक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

मुंबई - GST म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स चं डिजिटल पेमेंट केल्यावर आता तुम्हाला मोठी सूट मिळू शकणार आहे. नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिलपासून या नव्या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे. सरकारने ग्राहकांना सूट मिळवून देण्यासाठी अनेक स्टार्ट अप फायनान्स आणि टेक कंपन्यांना ही सिस्टीम बिल्ड करण्यासाठी एक चॅलेंज दिलंय. ही सिस्टीम बिल्ड करून देणाऱ्या कंपनीला इनाम देखील दिला जाणार आहे.

मोठी बातमी - क्या बात हैं ! 'या' भारतीय शास्त्रज्ञाने शोधलीये कोरोनावरील लस!

यामध्ये ग्राहकांनी GST भरण्यासाठी UPI प्लँटफॉर्म म्हणजेच BHIM, RuPay Card, Google Pay यांच्यासारख्या माध्यमांचा वापर केल्यास २० टक्क्यांएवढा कॅशबॅक मिळू शकतो.  मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये GST काउंसिलची बैठक घेण्यात आली होती, या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आलाय. 

मोठी बातमी - दोन तास चार्ज करा, 120 किलोमीटर पळवा!

भारतीय सरकारने याबाबत माहिती देताना फायनान्स आणि टेक कंपन्यांना एक कन्सेप्ट सादर करण्यास सांगितली आहे. यासाठी इच्छुक कंपन्या २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करू शकतात. सरकारला १ एप्रिलपासून ही योजना सुरु करायची आहे. यामार्फत डिजिटल इंडियाला चालना मिळेल. त्याचसोबत मिळणाऱ्या कॅशबॅक म्हणजेच डिस्काऊंटचा फायदा ग्राहकांना देखील मिळणार आहे. जी कंपनीही सिस्टीम बिल्ड करेल त्यांना सरकारकडून ३ लाखांचा इनाम देखील दिला जाणार आहे. 

मोठी बातमी - फडणवीसांच्या गळ्यात देशाच्या अर्थमंत्रीपदाची माळ ? पुढचा अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता..

येत्या काळात केंद्रात आणि राज्यात कारचोरीसाठी अद्ययावत यंत्रणा बनवली जाणार आहे. सध्या राज्यातील करअधिकारी हे वार्षिक डिड कोटी रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या करदात्यांचं जवळ जवळ सर्व काम पाहतात. उर्वरित काम हे केंद्राकडे आहे. अशात केंद्र आणि राज्यांमधील समन्वय अधिक सुकर आणि सुलभ होण्यावर देखील भर देण्यात येणार आहे.

pay gst through uip platforms and get twenty percent cashback 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pay gst through uip platforms and get twenty percent cashback