कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या; नीलम गोऱ्हे यांच्या ठाणे पालिका आयुक्तांना सूचना

कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या; नीलम गोऱ्हे यांच्या ठाणे पालिका आयुक्तांना सूचना

ठाणे : ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका व बदलापूर पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करून व किमान वेतनाचा फरक देण्याबाबत कर्मचाऱ्यांच्या मागणीच्या अनुषंगाने विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करून त्यांचा फरकही तत्काळ द्यावा, असे आदेश संबंधित प्रशासनाला दिले आहेत. तसेच सामाजिक न्याय विभागाची सफाई कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी सर्व पालिका व महापालिका यांच्यामध्ये राबवावी, अशा सूचना महापालिका आयुक्तांना त्यांनी दिल्या. 

या विषयाबाबतची मागणी कामगार नेते मिलिंद रानडे यांनी उपसभापती यांच्याकडे पत्रद्वारे केली होती. त्यानुसार ही बैठक आयोजित वेबिनारद्वारे झाली. रानडे यांनी 1400 सफाई कर्मचारी व 250 गाडीचे चालक यांचे किमान वेतनाप्रमाणे पगार द्यावा. प्रलंबित एक रकमी फरक द्यावा. कामगारांना प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत पगार द्यावा अशा मागण्या मांडल्या. दरम्यान, बैठकीला महापौर नरेश मस्के, महेश पाठक (प्रधान सचिव नगर विकास), ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हजर होते. महापौर नरेश म्हस्के यांनी सर्व कर्मचाऱ्यांना व्यक्तिगत संरक्षण कीट देण्यात येत असून, प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासंदर्भात प्रशासनास सूचना दिल्याचे सांगितले. 

फरक पाच हप्त्यांत देणार! 
या वेळी ठाणे महापालिका आयुक्त शर्मा यांनी किमान वेतन वेतनाचा फरक फेब्रुवारी 2015 ते नोव्हेंबर 2016 देण्यासंदर्भात महापौर म्हस्के यांनी सूचना दिल्याचे सांगितले. हा फरक पाच हप्त्यांत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापैकी दोन हप्ते यापूर्वीच दिलेली असून, डिसेंबर 2020 पूर्वी तिसरा हप्ता देण्यात येणार आहे. उर्वरित दोन हप्ते 2021 मध्ये देण्यात येतील, असे स्पष्ट केले. एकूण 17 कोटी रुपये प्रलंबित देणी असून, प्रत्येक हप्ता हा 5.50 कोटींचा असेल, असेही त्यांनी सांगितले.

Pay minimum wages to contract employees Neelam Gorhes instructions to Thane Municipal Commissioner

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com