"राज्यात एकाही मंत्र्याला फिरकू देणार नाही"; प्रकाश शेंडगेंचा सरकारला कडक इशारा

"राज्यात एकाही मंत्र्याला फिरकू देणार नाही"; प्रकाश शेंडगेंचा सरकारला कडक इशारा

मुंबई : आज मुंबईमध्ये आरक्षणाच्या मुद्यावर OBC तसेच VJNT संघर्ष समितीकडून एकत्रित पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेतून प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारला धारेवर धरलेलं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना प्रकाश शेंडगे यांनी आपलं मत रोखठोकपणे मांडले आहे. मराठा समाज जेंव्हा सरकारकडे जातो तेंव्हा सरकार त्यांना तातडीने प्रतिसाद देते. मराठा समाजाला सरकार वेगळं १३ टक्के आरक्षण देत असेल तर आमची काहीही हरकत नाही. मात्र OBC आरक्षणाला कोणताही धक्का लागला किंवा त्याला हात लावण्याचा प्रयत्न झाला तर मात्र राज्यात एकही मंत्र्याला फिरकू देणार नाही असा सज्जड दम प्रकाश शेंडगे यांनी सरकारला भरलाय. 

मराठा समाजाला OBC कोट्यातील आरक्षण देण्याबद्दल मराठा समाजाचे काही नेते बोलत होते, मात्र असा कोणताही प्रस्ताव दिला तर तो प्रस्ताव OBC समाज खपवून घेणार नाही. दरम्यान असा प्रस्ताव दिला गेलाच तर राज्यभरात त्याचे पडसाद उमटतील आणि आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असंही प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत. मराठा समाजाला जो न्याय दिला जातो तो न्याय आम्हाला मिळत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. जो न्याय मराठा समाजाला दिला जातो तोच न्याय OBC  समाजाला देखील मिळावा म्हणून येत्या मंगळवारी म्हणजेच 3 नोव्हेंबरला राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे अशी घोषणाही शेंडगे यांनी केली.

प्रकाश शेंडगे यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे छत्रपती यांनाही टोला लगावला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांनी एकाच समाजासाठी न झटता सर्व समाजासाठी झटावे, काम करावे असा टोला त्यांनी लावला. दरम्यान मराठा समाजातील काही नेत्यांकडून MPSC परीक्षा रद्द करवून घेतल्या गेल्यात, नोकर भरती आणि महावियालयीन प्रवेश रद्द करण्यात आली, अशात सरकार नेमकं कोण चालवत आहे  असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

prakash shendge took press conference in mumbai and spoke about maratha and OBC reservation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com