रायगडमधील अमृत आहार योजना थंडावली; निधी अभावी अंगणवाडी सेविका उधारीच्या ओझ्याखाली 

रायगडमधील अमृत आहार योजना थंडावली; निधी अभावी अंगणवाडी सेविका उधारीच्या ओझ्याखाली 

कर्जत ः कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, माता व बाळ मृत्यू रोखणे या मुख्य उद्देशाने राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने व महिला बाल विकास विभागाच्या समन्वयाने 16 आदिवासी जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या भारत रत्न डॉ . ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना रायगड जिल्ह्यात निधी अभावी थंडावल्याचे चित्र आहे. मागील पाच ते सात महिन्यांपासून कर्जत तालुक्‍यात अमृत आहार योजनेचा निधीच न आल्यामुळे अंगणवाडी सेविका स्थानिक धान्य दुकानदारांकडून उधारीने साहित्य घेत ही योजना राबवत आहेत. त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांवर उधारीचा डोंगर उभा राहिला असून त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे . 

रायगड जिल्ह्यात एकात्मिक बाल विकासाच्या सात प्रकल्पात व आदिवासी उपाय योजना क्षेत्र,माडा तसेच मिनी माडा क्षेत्रातील अंगणवाड्या या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील कर्जत तालुक्‍यात प्रकल्प एक व दोन मधील सर्वाधिक 147 अंगणवाड्यांमध्ये दिला जात आहे . तालुक्‍यातील 332 अंगणवाड्यांपैकी आदिवासी उपाय योजना क्षेत्रात असलेल्या 147 अंगणवाड्यांमध्ये भारत रत्न डॉ .ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविली जात आहे . 

या अंगणवाड्यांमध्ये मागील सात महिन्यापासून निधीच उपलब्ध नाही . कोरोना कालखंडात अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबातील अन्य सदस्यनाच्या हातालाही काम नाही त्यात निधी नसल्यामुळे पोषण आहारासाठी अंगणवाडी सेविकांनी स्थानिक दुकानदारांकडे उधारी करत कशी बशी योजना सुरु ठेवली आहे.

लॉकडाऊन मुळे अंगणवाड्या बंद आहेत. मात्र अंगण वाड्यातील लाभार्त्याना घरपोच कोरडा शिधा देण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे त्यांना पालन करावे लागत आहे. या संदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण च्या प्रकल्प अधिकारी शशिकला आहिराव आणि महिला बाल विकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. 

- गरोदर मातांना आहार 
अंगणवाडीत गरोदर महिलेची नोंद झाल्यापासून तिचे जन्मलेले बाळ सहा महिन्याचे होई पर्यंत आठवड्यातील सहा दिवस चौरस आहार असलेले एक वेळचे जेवण देण्याची तरतूद तसेच सहा महिने ते सहा वर्षाच्या पर्यंतच्या मुलाला दररोज एक उकडलेले अंडी देण्याची तरतूद असलेली ही अमृत योजना आदिवासी विकास विभागाच्या निधीतून व महिला बाल विकास विभागाच्या समन्वयाने राबविली जात आहे. दरम्यान या महिन्यात जर निधी उपलब्ध करून दिला नाही तर एक नोहेंबर पासून हि योजना राबविणे बंद करण्याचा निर्णय अंगणवाडी संघटनांनी घेतल्याचे समजते 

Amrit Ahar Yojana in Raigad cooled down Anganwadi worker under the burden of borrowing due to lack of funds

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com