'आई-बाबा मला माफ करा'; आत्महत्येपूर्वी पायलने लिहिली सुसाइड नोट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

मुंबईतील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. डॉ. तडवी यांनी आत्महत्येपूर्वी तीन पानांची सुसाइड नोट लिहिली. त्यामध्ये त्यांनी आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलत असल्याबाबत आई-वडिलांची माफी मागितली.

नवी दिल्ली : मुंबईतील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. डॉ. तडवी यांनी आत्महत्येपूर्वी तीन पानांची सुसाइड नोट लिहिली. त्यामध्ये त्यांनी आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलत असल्याबाबत आई-वडिलांची माफी मागितली.

डॉ. पायल तडवी या नायर रुग्णालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. तिने 22 मे रोजी आत्महत्या केली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी हेमा आहुजा, भक्ती मेहर आणि अंकिता खडेलवाल यांना 29 मे रोजी अटक करण्यात आली. पायलच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी आरोप केला, की तीन वरिष्ठ डॉक्टरांकडून जातीवाचक टीका केली जात होती. त्यामुळेच पायलने आत्महत्या केली. 

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले, की याप्रकरणी व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सुनावणी केली जावी.  

सुसाइड नोटमध्ये लिहिले, 'मला माफ करा'

आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आता समोर आली आहे. यामध्ये तिने लिहिले, की आई-बाबा मला माफ करा. मी माझे आयुष्य संपवत आहे. मला माहीत आहे, मी तुमच्या दोघांच्या दृष्टीने माझा हा निर्णय खूप वेदनादायक आहे. मात्र, आता मला एक मिनिटही सहन होत नाही. हे लवकरच संपेल, अशा आशेने मी मागील एक वर्षापासून सर्वकाही सहन करत आले. पण मला आता असं वाटत नाही, की मी आता सहन करू शकते. माझ्याकडे आता कोणताही पर्याय उरलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Payal Tadvis chilling suicide note reveals her traumatic experience before death