शिक्षकांना पगाराची पावती देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

मुंबई - शिक्षकांना प्रत्येक महिन्याच्या अखेरीस पगाराची पावती देणे दोन वर्षांपासून बंद झाले आहे. कोकण विभागाचे माजी आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षण विभागाने या बाबतीत ताबडतोब कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

सरकारमान्य अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतरांचा पगार ऑनलाइन पद्धतीने बॅंकेत जमा केला जातो. या पगारातील मूळ पगार, महागाई भत्ता, अन्य भत्ते, पगारवाढ, कपात आदी माहिती शिक्षकांना मिळत नाही. सतत पाठपुरावा केल्यानंतर दरमहा मिळणाऱ्या पगाराचे विवरणपत्र, पावती काही दिवस देण्यात येत होते, असे मोते यांनी सांगितले. नंतर ते बंद झाले. दोन वर्षे पूर्ण झाली तरीही पावत्या मिळत नसल्याची तक्रार शिक्षक करत आहेत. मोते यांनी मुंबई विभागाच्या शिक्षण उपसंचालकांना याबाबत पत्र लिहिले आहे.

Web Title: payment receipt give to teacher