दादर स्थानकातील पादचारी पूल 90 दिवस बंद 

Mumbai-bridge-collapse-
Mumbai-bridge-collapse-

मुंबई : सीएसएमटी स्थानकाजवळील पादचारी पुल कोसळून सहा जणांचा बळी गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाला पुन्हा धोकादायक पुलांची आठवण झाली आहे. मुंबईतील विविध रेल्वे पुलांची तपासणी करण्यास सुरुवात झाली असून, या तपासणीनंतर पश्‍चिम रेल्वेच्या हद्दीतील दादर स्थानकातील पूल दुरुस्त करण्यात येणार आहे. हा पादचारी पूल 90 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे पश्‍चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 
2018 मध्ये झालेल्या गोखले पुल दुर्घटनेनंतरही रेल्वेने अशाच पध्दतीने काही पुल दुरुस्तीसाठी बंद केले होते. मात्र, पुढील काही दिवसातच पुलांची तपासणी मागे पडली.

शुक्रवारी दादर (द.15) एमसीजीएम पादचारी पुलाची पश्‍चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. या तपासणीनंतर फलाट क्र. 1, 2 आणि 3 मधील पुलाच्या पायऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरत्या बंद करण्यात येणार असल्याची माहिती पश्‍चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. फलाट क्रमांक 1 वरील पादचारी पूल 17 मार्च ते 16 जूनपर्यंत म्हणजेच 90 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. दादरच्या या पुलावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ आढळते. पादचारी पूल बंद करण्यात येणार असल्याने प्रवाशांना मोठा वळसा घालून यावे लागणार आहे. दरम्यान, यावेळी प्रवाशांसाठी पूर्वेकडून पश्‍चिमेकडे जाण्यासाठी मुख्य पादचारी पूल उपलब्ध असणार असल्याची माहिती पश्‍चिम रेल्वेचे अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. 

सध्या रेल्वेच्या हद्दीतील सर्व पादचारी पुलांची तपासणी सुरु केली आहे. पहिल्याच दिवशी दादरच्या पुलाची तपासणी केल्यानंतर तो धोकादायक आढळल्यावर तत्काळ बंद करण्यात आला आहे. आता, पुढील तपासणीत इतर धोकादायक पूलही दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com