esakal | मिठी नदीवर पादचारी झुलता पूल; तसेच पुलावर पारदर्शी काचा बसविण्याचा मानस
sakal

बोलून बातमी शोधा

मिठी नदीवर पादचारी झुलता पूल; तसेच पुलावर पारदर्शी काचा बसविण्याचा मानस

नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मिठी नदीवर अनोखा प्रकल्प साकारण्याचे ठरवले आहे.

मिठी नदीवर पादचारी झुलता पूल; तसेच पुलावर पारदर्शी काचा बसविण्याचा मानस

sakal_logo
By
तेजस वाघमारे


मुंबई : नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मिठी नदीवर अनोखा प्रकल्प साकारण्याचे ठरवले आहे. देशातील सर्वात लांब आणि विदेशात असणाऱ्या पारदर्शी पुलाप्रमाणे वांद्रे कुर्ला संकुलातील सिटी पार्क ते महाराष्ट्र निसर्ग उद्यान दरम्यान झुलता पादचारी उभारण्यात येणार आहे. या पुलावर काचा बसविण्याचा प्रशासनाचा मानस असून लवकरच एमएमआरडीए मुंबईकरांना परदेशातील पारदर्शी पुलाचा अनुभव मुंबईत देणार आहे.

मुंबईत कोव्हिडचा मृत्यूर 4.6 टक्क्यांवर; 20 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरमध्ये 2.2 टक्के नोंद

एमएमआरडीएचा 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच मंजूर झाला आहे. हा अर्थसंकल्प 15 हजार 819 कोटींचा असून यामध्ये परिवहन व दळणवळण, मेट्रो, मोनो यासह विविध प्रकल्पांसाठी 14 हजार 741 कोटींची भरीव तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पात वांद्रे कुर्ला संकुलातील सिटी पार्क ते महाराष्ट्र निसर्ग उद्यान दरम्यान झुलता पूल उभारण्यासाठी 50 कोटींची तरतूद केली आहे. हा पूल मिठी नदीवर उभारला जाणार आहे. हा पूल देशातील सर्वात लांब म्हणजे 500 मिटरहून अधिक लांबीचा असेल. या पुलावर मधील भागावर काचा बसविण्यात येणार असून त्यावरून मुंबईकरांना पुलाखालील नजारा पहाता येणार आहे.
यंदाचा अर्थसंकल्प 15 हजार 819 कोटींचा असून यामध्ये 3 हजार 270 कोटी रुपये तूट दर्शविण्यात अली आहे. मेट्रो मार्ग आणि मुंबई पारबंदर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीए 5 हजार कोटींचे कर्ज घेणार आहे. तसेच जमीन विक्रीतून 2 हजार 353 कोटी रुपये मिळविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. वांद्रे कुर्ला समूह अतिरिक्त बांधकाम क्षेत्र धरून 2 हजार 33 कोटी रुपये, ओशिवरे जिल्हा विकास केंद्र विक्रीतून 10 कोटी, वडाळा ट्रक टर्मिनसच्या जमीन विक्रीतून 3 हजार 10 कोटी रुपये मिळतील असा अंदाज आहे. याचबरोबर विकास हक्क हस्तांतरण मधून 4 हजार 56 कोटी अपेक्षित आहेत.

रायगडमध्ये अतिवृष्टीची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

परिवहन व दळणवळण विभागासाठी 1 हजार 16 कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये माथेरान फ्युनिकुलर रेल्वे 1 कोटी, बिकेसी पश्चिम द्रुतगती मार्गालगत रेट्रो रिफ्लेकटीव्ह अनिवार्य, सूचनाफलक व सावधगिरीचे बोर्ड बसविण्यात येणार आहेत. यासाठी 57 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर या मार्गाकरिता योग्य जलद परिवहन सेवेची अंमलबजावणी करण्यासाठी 100 कोटी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रवेश नियंत्रण शहरी सरेखन वाहतूक प्रणाली सरेखन तसेच मुंबईतील वाहतुकीसाठी सिग्नल फ्री जंक्शनची अंमलबजावणी करण्यासाठी 100 कोटी, सिटी पार्क ते महाराष्ट्र निसर्ग उद्यान दरम्यान पादचारी झुलता पूल उभारणीसाठी 50 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
मेट्रो मार्गांसाठी 6 हजार 737 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर मोनो रेलसाठी 132 कोटींची तरतूद केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी 200 कोटींची तरतूद आहे.

----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )