पेणमध्ये 40 जणांना अन्नबाधा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

वडखळ (जि. अलिबाग) - पेण तालुक्‍यातील ढोंबी गावात सुमारे 40 जणांना अन्नबाधा झाली आहे. 26 जणांना गडब प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती खालावली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इतरांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. रामनवमी उत्सवानिमित्त रविवारी दिलेल्या गावजेवणातून किंवा पाण्यातून ही बाधा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. काराव-गडब ग्रामपंचायत हद्दीत ढोंबी हे गाव आहे. रविवारी रामनवमीनिमित्त येथे गावजेवण झाले होते. सोमवारी रात्री अचानक ग्रामस्थांना अस्वस्थ वाटून मळमळणे, जुलाब, अंगदुखी व थकवा इत्यादी त्रास जाणवू लागला. मंगळवारी सकाळी जास्तच त्रास होऊ लागला.
Web Title: pen mumbai news 40 people food poisioning