पेण येथे मजुरांच्या झोपड्या खाक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

पेण  - पेण-अंतोरे फाटा येथे स्थलांतरित आदिवासी मजुरांच्या झोपड्यांना मंगळवारी (ता. 27) दुपारी अचानक आग लागली. आगीत नऊ झोपड्यांसह एक मोटरसायकल खाक झाली असून, आदिवासी मजूर कुटुंबांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. पेण तालुक्‍यातील पाचगणी येथील ही कुटुंबे बांधकाम मजूर म्हणून काम करत आहेत. झोपड्यांतील गादी, कपडे, लाकडे, अन्नधान्य, सोन्याच्या वस्तूंबरोबरच आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांचेही तीन लाख 11 हजारांचे नुकसान झाले. पेण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्‍यात आणली.
Web Title: pen news labour slum fire