पेंग्विन म्हणजे कबूतर नाही  - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

मुंबई - पेंग्विन आणणे म्हणजे क्रॉफर्ड मंडईतून कबूतर आणण्याएवढे सोपे नाही. पारदर्शक काचेतून आता पेंग्विन पाहता येतील, असा टोला आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसह विरोधकांनाही मारला. 

भायखळा येथील राणीच्या बागेतील पेंग्विन कक्षाचे आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्या वेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. मुंबईत पेंग्विन आणण्याची कल्पना पुढे आली, तेव्हा राजकीय गदारोळ झाला. पेंग्विनना कसे ठेवतात, कोठे ठेवतात याची माहिती नसलेल्यांनी हा गोंधळ घातला. क्रॉफर्ड मार्केटमध्ये जाऊन कबूतर आणावे, असे वातावरण तयार करण्यात आले, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. 

भाजपने महापालिकेच्या निवडणुकीत पारदर्शकतेचा मुद्दा उचलून धरला होता. त्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजपला चिमटा काढला. आमची काच ही पारदर्शक आहे. कुणीही या आणि पेंग्विन पाहा, असा चिमटा त्यांनी काढला. या वेळी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, पालिका आयुक्त अजोय मेहता उपस्थित होते. 

Web Title: Penguin is not the dove