बसच्या माहितीसाठी प्रवाशांना बेस्ट हेल्पलाईनची मदत; दररोज शेकडो कॉलची नोंद..  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

best bus

लॉकडाऊनमध्ये लोकल बंद असल्याने अत्यावश्यक सेवेसाठी बेस्ट दिवस-रात्र धावली. लॉकडाऊन शिथील करण्यात आल्याने अडीच महिन्यांनंतर बेस्ट आता  सर्वसामान्यांसाठी सेवा देते आहे.

बसच्या माहितीसाठी प्रवाशांना बेस्ट हेल्पलाईनची मदत; दररोज शेकडो कॉलची नोंद.. 

मुंबई: लॉकडाऊनमध्ये लोकल बंद असल्याने अत्यावश्यक सेवेसाठी बेस्ट दिवस-रात्र धावली. लॉकडाऊन शिथील करण्यात आल्याने अडीच महिन्यांनंतर बेस्ट आता  सर्वसामान्यांसाठी सेवा देते आहे. मात्र अनेक प्रवाशांना बेस्टचा प्रवास करताना बसेसची माहिती मिळत नाही. त्यामुळे माहिती करिता बेस्टच्या हेल्प-लाईनवर प्रवाशांचे शेकडो कॉल येणे सुरु झाले. त्यामुळे कोरोना संकटात बेस्टची हेल्पलाईनही प्रवाशांसाठी बेस्ट ठरली आहे.

बेस्ट उपक्रमातर्फे कोरोनाचा संसर्ग पसरू नये, याकरता झटणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिन्यापासून विशेष बसफेऱ्या सुरू केल्या. मुंबईसह इतर परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बसफेऱ्या चालविल्या जात होत्या. आता रेल्वेसेवा सुरु झाल्याने बेस्ट उपक्रमाने अत्यावश्यक सेवेसाठी बेस्ट बंद केली. 

हेही वाचा: "गोपीचंद पडळकर यांना मानसोपचाराची गरज"; रुपाली चाकणकर यांचे प्रत्युत्तर.. 

त्यामुळे सर्व सामान्य प्रवाशांसाठी बसच्या अधिक फेऱ्या वाढल्या असून बस प्रवाशांची संख्याही वाढली आहे. अत्यावश्यक सेवांसाठी चालवण्यात येणाऱ्या फेऱ्यांची संख्या दैनंदिन स्तरावर साधारण १८०० पर्यंत होती. ती संख्या आता २ हजार ७८६ पर्यंत पोहोचली आहे. सर्व सामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा बंद असल्याने आता प्रवाशांनी आपला मोर्चा बेस्ट बसेसकडे वळवला आहे. 

यात अनेक प्रवाशांना बेस्ट बसेसच्या नंबरची माहिती नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना अडचणी निर्माण होत आहे. बेस्टच्या वाहतूक विभागाने प्रवाशांसाठी सुरु केलेल्या १८००२२७५५० या हेल्पलाईनवर गेल्या काही दिवसात शेकडो कॉल आले आहे. यात प्रवाशांनी विचारलेली आवश्यक माहिती मिळते आहे. लॉकडाऊन पूर्वी साधारणता प्रत्येक दिवशी १५० तक्रारी येत होत्या. 

हेही वाचा: बापरे! मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कामगारांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; 'हे' आहे कारण..

ज्यात बेस्टचा विद्युत विभागाच्या तक्रारींचा सुद्धा समावेश आहे.  सध्या कोरोनाच्या संकटात सामान्य प्रवाशांना परवडणारे साधन म्हणून बेस्टकडे प्रवासी मोठ्या प्रमाणात वळले आहे.  बेस्टच्या वाहतूक विभागाच्या हेल्पलाईन नंबरवरही  प्रवाशांचे अनेक कॉल येत आहे. त्यांना  योग्य माहिती देऊन त्यांची मदत करत असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले. 
people are taking advantage of best helpline 

Web Title: People Are Taking Advantage Best Helpline

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top