कर्जतमध्ये गवती चहाचा दरवळ!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

एरव्ही दुर्लक्षित असलेला आणि बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या गवती चहाला सध्या साथीच्या आजारांमुळे कर्जतमध्ये प्रचंड मागणी वाढली आहे. त्यामुळे परिसरात गवती चहा दरवळत आहे. 

कर्जत (बातमीदार) : एरव्ही दुर्लक्षित असलेला आणि बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या गवती चहाला सध्या साथीच्या आजारांमुळे कर्जतमध्ये प्रचंड मागणी वाढली आहे. त्यामुळे परिसरात गवती चहा दरवळत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थंड पेय वर्ज्य करून वारंवार गरम पाणी, चहा पिण्याचे सल्ले समाजमाध्यमांद्वारे दिले जात आहेत. परिणामी, कर्जतमधील भाजीवाल्यांनी तसेच हार विक्रेत्यांनी जोडधंदा म्हणून गवती चहाची विक्री सुरू केली आहे. सध्या पाच आणि दहा रुपयाला जुडीची विक्री सुरू आहे, असे विक्रेत्याने सांगितले. 

महत्त्वाची बातमी : नवी मुंबईत कोरोनाबाधितांचे अर्धशतक; एकाच कुटुंबातील ६ जणांना लागण

गवती चहामुळे सीडीटी कमी होते. तसेच डोकेदुखी थांबते, असेही बोलले जात असल्याने दिवसभर घरात बसून वैतागलेली कुटुंबे गवती चहा पिऊन तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करत आहेत. याचप्रमाणे आल्याच्या मागणीतही काही अंशी वाढ झाली आहे. कोरोनाच्या धास्तीने घसा निर्जंतुक ठेवण्यासाठी नागरिक वेगवेगळे प्रयोग करत आहेत. 

हेही वाचा... मुंबईकरांसाठी गुडन्यूज..! एपीएमसी मार्केट होणार सुरू

ज्यांना भाजीवाल्यांकडे गवती चहा मिळत नाहीत, असे नागरिक मित्र परिवाराकडे मागणी करत आहेत. घराशेजारी लागवड केल्याने शेजारधर्म पाळत मागेल त्याला गवती चहाची पाने खुडून देत आहोत. 
- रमण गांगल, नागरिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People Demanding to Grass tea