
अखेर महामुंबईतील दुकाने ऊघडण्यास सुरुवात झाली. जवळपास दोन महिन्यानंतर दुकाने ऊघडताना दुकानदारांचे चेहरे प्रफुल्लीत होते.
अखेर महामुंबईतील दुकाने उघडली! बाजारात उत्साह परतला...
अखेर महामुंबईतील दुकाने उघडली
मुंबई ः अखेर महामुंबईतील दुकाने ऊघडण्यास सुरुवात झाली. जवळपास दोन महिन्यानंतर दुकाने ऊघडताना दुकानदारांचे चेहरे प्रफुल्लीत होते. जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची दुकाने सम-विषम तत्त्वावर शुक्रवारपासून सुरु झाली. एकंदरीत मुंबई तसेच परिसरातील बाजार फुलण्यास सुरुवात झाली आहे.
बापरे! मुंबईत 'हे' आहे प्रदुषणाचं मुख्य केंद्र; पश्चिम उपनगरं आहेत सर्वाधिक प्रदूषित..
दुकाने ऊघडण्याचे औत्सुक्य अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होते. दुकाने ऊघडणार असल्यामुळे रस्त्यावरील गर्दीही नेहमीपेक्षा जास्त होती. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाल्याचे दिसत होते. अर्थात त्यांची चिंता कोणी करीत नव्हते. दुकाने ऊघडलेली पाहून खूप चांगले वाटत आहे. सर्व व्यवहार सुरळीत होण्याची ही सुरुवात आहे, असेच अनेकांचे मत होते.
तयार कपडे, बेड शिटस््, कर्टन, भांडी, टेलरिंग, पादत्राणे यांची विक्री सुरु झाली तसेच अनेक ठिकाणी फेरीवालेही दिसले. अनेक दुकानात सकाळी खरेदीसाठी माफक गर्दीही झाली होती. दुकाने सुरु करताना प्रत्येकाने आपण दुकानाचे निर्जंतुकीकरण केले आहे तसेच ग्राहकांना एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवण्यास सांगणार आहोत, असे आवर्जून सांगितले. आज आम्ही सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. दोन महिने बंद असलेली दुकाने उघडली आहेत, आता आमचा धंदा सुरु होणार आहे, असे मुंबईतील दुकानदार मालक संघटनेचे सचिव विरेन शाह यांनी सांगितले.
किळसवाणा प्रकार ! उत्कृष्ट जेवणाच्या नावाखाली क्वारंटाईन सेंटरमध्ये दिलं आळ्या आणि माशीयुक्त अन्न
दुकाने खुली करण्यास परवानगी दिली असली तरी ती सम विषम नियमाने सुरु राहतील तसेच सुरक्षित अंतराचे पालन करावे लागेल याची जाणीव प्रशासनाने पुन्हा करुन दिली. अर्थात दुकाने सकाळी नऊ वाजता खुली झाली असली तरी त्यांच्या वेळेवर मर्यादा आहेत.