esakal | परदेशातून परतणाऱ्यांबाबत मोठी बातमी - परदेशातून येणार्यांना थेट 'इथे' पाठवणार...  
sakal

बोलून बातमी शोधा

परदेशातून परतणाऱ्यांबाबत मोठी बातमी - परदेशातून येणार्यांना थेट 'इथे' पाठवणार...  

परदेशातून मुंबई येणार्या भारतीयांच्या त्यांच्या मुळ जिल्ह्यात पाठविण्यात येणार आहे. फक्त कोरोना सदृष्य लक्षणं असलेल्या व्यक्तींना मुंबईत ठेवण्यात येणार आहे

परदेशातून परतणाऱ्यांबाबत मोठी बातमी - परदेशातून येणार्यांना थेट 'इथे' पाठवणार...  

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : परदेशातून मुंबई येणार्या भारतीयांच्या त्यांच्या मुळ जिल्ह्यात पाठविण्यात येणार आहे. फक्त कोरोना सदृष्य लक्षणं असलेल्या व्यक्तींना मुंबईत ठेवण्यात येणार आहे. या प्रवाशांना 14 दिवस सरकारी केंद्रात राहाणे बंधनकार असून त्यानंतर 14 दिवस घरी एकांतात राहावे लागणार आहे. 

परदेशातील भारतीयांना आणण्यासाठी केंद्र सरकार विशेष मोहिम राबवणार आहे. त्यात मुंबई विमानतळावर अनेक नागरिक उतरण्याची शक्यता आहे. या प्रवांशामची विमानतळावर प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहेत. त्या कोरोना सदृष्य लक्षणं असलेल्या प्रवाशांना मुंबईत उपचारासाठी ठेवण्यात येईल. इतराांना त्याच्या राज्यात जिल्ह्यात पाठविण्यात येणार आहे. विमानतळावर त्यांच्यासाठी वाहानांची सोयही करण्याचा विचार सुरु आहे.

मोठी बातमी - तुमच्या आमच्या EMI बद्दल सर्वात मोठी बातमी! RBI देणार मोठा दिलासा?

महामुंबईतील प्रवशांना फक्त मुंबईत क्वारंटाईन करण्यात येणार आहे. कोणतीही लक्षणं नसलेल्या प्रवाशाला भारतात 14 दिवस सरकारी केंद्रांमध्ये क्वारंटाईन होणे सक्तीचे आहे. या काळातला खर्चही संबंधित व्यक्तीने द्यायचा आहे. 14 दिवासाच्या कालावधित प्रवाशात कोरोनाची कोणतीही लक्षणं न दिसल्यास त्याला घरी पाठवण्यात येईल.मात्र, त्यानंतरची 14 दिवसही घरात एकांतात राहावे लागणार आहे. 

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार प्रवासांसाठीची नियमावली तयार करण्यात आली आहे.अशी माहिती पालिकेच्या एका अधिकार्याने दिली .मुंबईत फक्त महामुंबईतील प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. इतर जिल्हातील राज्यातील प्रवाशांना त्याच्या मुळ ठिकाणी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

people returning from mumbai will be sent to their respected districts

loading image
go to top