तुमच्या आमच्या EMI बद्दल सर्वात मोठी बातमी! RBI देणार मोठा दिलासा?

तुमच्या आमच्या EMI बद्दल सर्वात मोठी बातमी! RBI देणार मोठा दिलासा?

मुंबई - कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला गेला. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यापासूनच देशभरातले सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झालेत. त्यानंतर नोकरदार आणि व्यावसायिकांना आरबीआयनं मोठा दिलासा दिला. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यातच आरबीआयनं गृह, वाहन कर्जासह अन्य कर्जांचे EMI तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याची परवानगी बँकांना दिली. त्यानंतर आता पुन्हा कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर RBI कडून पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

येत्या काही दिवसात आरबीआयकडून सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्यांची वसूली आणखी तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरबीआयनं जर असा निर्णय दिल्यास सामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आरबीआय याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. 

सर्व बँकांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत, आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांना हा सल्ला देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामुळे कॅशफ्लो वाढण्याचा अंदाज वर्तवला जातोय.

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यातच आरबीआयनं गृह, वाहन कर्जासह अन्य कर्जांचे EMI तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याची परवानगी बँकांना दिली होती. तीन महिने बँकांनी ईएमआय कापू नये, असं रिझर्व्ह बँकेनं सुचवलं. 

आरबीआयनं दिलेल्या सुचनेनुसार, कॅनरा बॅंक, आयडीबीआय, एचडीएफसी, पंजाब नॅशनल आणि बॅंक ऑफ बडोदाने पुढील तीन महिने मासिक हप्ता न घेण्याचा निर्णय घेतला. 

एसबीआयकडून कर्जांचे हफ्ते 3 महिन्यांसाठी स्थगित

आरबीआयच्या सल्ल्यानंतर एसबीआयकडून कर्जांचे हफ्ते 3 महिन्यांसाठी स्थगित करण्यात आले. मुदतीच्या कर्जासाठी हप्ते आपोआप तीन महिन्यांपर्यंत पुढे ढकलले जातील आणि त्यासाठी ग्राहकांना बँकांना अर्ज करण्याची गरज नसल्याचंही एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी स्पष्ट केलं. 

रेपो रेटमध्ये कपात 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरबीआयनं रेपो रेटमध्येही कपात केली. रेपो रेटमध्ये 0.75 टक्क्यांची कपात केल्याची घोषणा याआधीच शक्तिकांता दास यांनी केली. त्यामुळे रेपो रेट 5.15 टक्क्यांवरुन 4.4 टक्क्यांवर आला आहे. रिव्हर्स रेपो रेटमध्ये 0.90 टक्क्यांची कपात केली आहे. यावेळी कोरोना व्हायरसमुळे जागतिक अर्थव्यवस्था 2 ते 3 वर्ष मागे गेली असल्याचंही शक्तिकांता दास यांनी स्पष्ट केलं होतं. 

दरम्यान लॉकडाऊनचा वाढता काळ पाहता सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्यांची वसूली आणखी तीन महिन्यांसाठी स्थगित केली तर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र याचा पूर्णपणे निर्णय हा बँकांच्या हाती असेल हे देखील विसरायला नको.

RBI may give extended moratorium for three more moths read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com