esakal | या सुशिक्षीत अडाणी लोकांना समजवणार कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अनेक चौकात, बस स्टॉप, नाक्‍यावर ज्येष्ठ नागरिक गप्पा मारत उभे असल्याचे आढळून येत होते. 

या सुशिक्षीत अडाणी लोकांना समजवणार कोण?

sakal_logo
By
शरद वागदरे

नवी मुंबई (बातमीदार) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेसाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले असतानाही नवी मुंबईसह अनेक ठिकाणी सोमवारी (ता.23) सकाळपासूनच लोक रस्त्यावर दिसून येत होते.

विशेषतः 60 वर्षांवरील ज्येष्ठांनी काळजी घ्यायला हवी, असे सांगितले जात असतानाही अनेक चौकात, बस स्टॉप, नाक्‍यावर ज्येष्ठ नागरिक गप्पा मारत उभे असल्याचे आढळून येत होते. 

हे ही महत्वाचे...महाराष्ट्रात संचारबंदी लागू 


रविवारचा जनता कर्फ्यू दिवशी सकाळी लोक घरात बसून राहिले खरे, पण सायंकाळनंतर अनेक जण बाहेर दिसून येत होते. पोलिसांच्या आवाहनानंतर, तसेच काहींना दंडुक्‍याचा प्रसाद मिळाल्यानंतर त्यांनी घरची वाट धरली. तीच स्थिती सोमवारीही पाहण्यास मिळाली. अनेक नागरिक बिनधास्त दुचाकी, चारचाकी घेऊन रस्त्यावर फिरत होते. पाचपेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र येऊ नये, अशी सूचना असतानाही घोळक्‍याने गप्पा मारतानाही लोक दिसत होते.

 
दुपारी बाराच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांनी आवाहन केल्यानंतर पुन्हा रस्त्यावर सामसूम दिसून येत होती. अनेक जण किराणामाल भरण्यासाठी दुकानात गर्दी करत होते. भाजी विक्रेत्यांचीही मोजकीच दुकाने सुरू होती. तेथेही मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. 

हे ही महत्वाचे...आम्हीही माणसे आहोत 
 

समजावणार कोण? 

लॉकडाऊन असतानाही सकाळी अनेक लोक रस्त्यावर दिसत होते. त्यात ज्येष्ठांची संख्या अधिक होती. अनेकजण नातवंडांना घेऊन बाहेर पडले होते. मात्र मास्क लावण्यासारखी प्राथमिक सुरक्षा घेण्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत होते. घरी बसून कंटाळा येत आहे. मुलांचीही चिडचिड होतेय, अशी कारणे ज्येष्ठांमार्फत दिली जात होती. सरकारमार्फत कोरोनाबाबत वारंवार केल्या जाणाऱ्या आवाहनाचे गांभीर्य लोकांमध्ये नसल्याचेच एकूण चित्र होते.