कोरोना संसर्गातून ब-या झालेल्या रुग्णांना जाणवतात पचन विकाराच्या समस्या

भाग्यश्री भुवड
Thursday, 24 September 2020

कोविड संसर्गातून बरे झाल्यानंतही त्याच्या दीर्घकालीन परिणामाबद्दल आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल.

मुंबई, 24: - कोरोनाच्या संसर्गातून बऱ्या झालेल्या अनेक रुग्णांना गुलियन बॅरे सिंड्रोम (जीबीएस), फुफ्फुसातील फायब्रोसिस, हृदय किंवा मूत्रपिंडातील समस्या, रक्तवाहिन्यांत गुठळ्या होणे, न्यूमोनिया आणि अगदी अशक्तपणा यांसारख्या अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे ओपीडीत येणा-या रूग्णांत दिसून येत आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाणात हे पचन क्रियेसंबंधी त्रास असणा-यांचे आहे. याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असून मसालेदार, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळावे आणि वेळीच योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

कोविड संसर्गातून बरे झाल्यानंतही त्याच्या दीर्घकालीन परिणामाबद्दल आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. दिर्घकालीन परिणामांमध्ये पचनसंस्थेसंबंधीत विकार देखील उद्भू शकतात असे निदर्शनास आले असून कोविडमधून बरे झाल्यानंतरही बर्याच रूग्णांना भूक न लागणे किंवा भूक वाढणे, ओटीपोटात वेदना होणे, आंबटपणा, अतिसार आणि उलट्या यांसारख्या समस्या जाणवत आहेत. योग्य वेळी उपचार न घेतल्यास ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. वेळीच निदान, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला तसेच औषधोपचाराने या विकारांवर मात करता येऊ शकते अशी माहिती झेन रुग्णालयातील पोटविकार तज्ज्ञ डॉ. रॉय यांनी दिली आहे.

महत्त्वाची बातमी : शरद पवारांची संपत्ती आहे तरी किती ? सगळी माहिती आहे या रिपोर्टमध्ये

पाचक प्रणालीमध्ये यकृत, स्वादुपिंड आणि पित्त मूत्राशय यांच्यासह जठर आतड्यांच्या व्यवस्थेचा (जीआय) समावेश आहे आणि कोविडमुळे शरीराच्या इतर अवयवांनाच नव्हे तर जठर आतड्यांच्या व्यवस्थेमध्ये (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट) देखील व्यत्यय येत असल्याचे दिसून येते. जीआय ट्रॅक्टचे कार्यात व्यत्यय आल्याने शरीरातून इलेक्ट्रोलाइट्स आणि द्रवपदार्थ शोषून घेण्याच्या कामात अडथळा निर्माण होतो. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टच्या रक्तस्त्रावामुळे देखील रुग्णांचा अंत होऊ शकतो. तसेच लहान मुले आणि प्रौढांना मधुमेहाची लागण देखील होऊ शकते.

काय काळजी घ्याल?

  • रोगप्रतिकार शक्ती वाढवणा-या पदार्थांचे सेवन करा:
  • ताजी फळे, भाज्या, शेंगदाणे आणि सर्व प्रकारचे धान्य अशा संतुलित आहाराचे सेवन करा.
  • जंक फुड, मसालेदार, प्रक्रिया केलेले, खारट आणि चवदार पदार्थ खाणे टाळा.
  • कार्बोनेटेड पेये आणि कोबीवर्गीय भाज्यांचे वन करणे टाळा.
  • फायबरयुक्त आणि हेल्दी फॅट्सचे सेवन करा. आतड्याचे चांगले आरोग्य राखण्यासाठी प्रोबायोटिक्सचे सेवन करा.
  • पाणी पिण्यास विसरू नका आणि हायड्रेटेड रहा.
  • मद्यपान आणि धूम्रपान करू नका.

महत्त्वाची बातमी :  भिवंडी दुर्घटनाः कंगनाचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल

अन्न योग्यरित्या चावून खा : 

अन्न योग्य प्रकारे चावून न खाल्ल्याने आम्लपित्त होऊ शकते. म्हणून, हळूहळू खा आणि आपण जे अन्न खातो त्यातील पोषणमुल्यांकडे लक्ष द्या. अन्न नीट चावून खालल्ल्याने लाळ निर्माण होण्यास मदत होते ज्यामुळे आपल्या तोंडात पाचक प्रक्रिया सुरू होऊ शकते.

व्यायाम आणि तणावमुक्त रहा: शारीरिकरित्या सक्रिय राहणे आणि जॉगिंग, धावणे आणि चालणे यासारख्या व्यायामप्रकाराचा दैनंदिन जीवनात समावेश करा. यामुळे -हदयातील जळजळ, आंबटपणा आणि बद्धकोष्ठतेची लक्षणे कमी होऊ शकतात. योगा आणि मेडिटेशनचा पर्याय वापरून तणावमुक्त रहा.

( संपादन - सुमित बागुल ) 

people who cured from corona are facing digestive problems read full report


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people who cured from corona are facing digestive problems read full report