रंगला असा पालखी सोहळा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

नरवीर तान्‍हाजी मालुसरे यांचा भव्यदिव्य त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी शौर्यदिन व पुण्यतिथी सोहळा उमरठ येथे आजपासून उत्साहात व इतिहासप्रेमींच्या अलोट गर्दीत सुरू झाला.

पोलादपूर (बातमीदार) ः नरवीर तान्‍हाजी मालुसरे यांचा भव्यदिव्य त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी शौर्यदिन व पुण्यतिथी सोहळा उमरठ येथे आजपासून उत्साहात व इतिहासप्रेमींच्या अलोट गर्दीत सुरू झाला. या वर्षी सिंहगड ते उमरठ शौर्य पालखी यात्रा शनिवारी (ता. १५) पहाटे ६ वाजता सिंहगड येथून सुरू करण्यात आली.

ठाणे पालिकेत सत्ताधारी, प्रशासन आमनेसामने... का आले आमनेसामने?

प्रारंभस्थळी नरवीर उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे दाखल झाले. पालखी यात्रा संकल्पनाकार मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अमर अडके, शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कदम, नरवीर सूर्याजी मालुसरे समिती साखरचे अध्यक्ष अनिल मालुसरे, टायगर ग्रुपचे अध्यक्ष दीपक उतेकर या वेळी उपस्थित होते.

उन्‍हाळी भाताचा शेतकर्!यांना हात... हे कसे काय?

रविवारी सकाळी पारमाचीजवळ मालुसरे वंशज राहत असलेल्या चार-पाच गावांतून पालखी त्यांच्यामार्फत बिरवाडी ढालकाठी शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या शिवनेरी येथे दाखल झाली. या वेळी पोलादपूर येथे स्वागतासाठी चंद्रकांत कळंबे पुन्हा दाखल झाले. त्याबरोबरच नगराध्यक्ष नागेश पवार, अश्‍विनी गांधी, सुनीता पार्टे,  माजी नगराध्यक्ष नीलेश सुतार, शहर शिवसेनाप्रमुख सुरेश पवार, माजी उपनगराध्यक्ष सिद्धेश शेठ, उपशहरप्रमुख राजन पाटणकर, नितीन भोसले आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती चौक येथून स्वागत मिरवणूक काढण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People's Crowd in Umarath