esakal | उन्हाळी भाताचा शेतकऱ्यांना हात
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगड ः सजन, झडपोली गावात उन्हाळी भातशेतीची रोवणी पूर्ण झाली आहे. 

विक्रमगड ः कष्टदायी आणि त्रासाची ठरत असल्याने अनेकांनी शेती करण्याकडे पाठ फिरवल्यामुळे गावातील पडीक क्षेत्रात वाढ होत आहे; मात्र विक्रमगड तालुक्‍यातील शेतकरी त्यावर मात करत यशस्वी शेती करत आहे.

उन्हाळी भाताचा शेतकऱ्यांना हात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विक्रमगड ः कष्टदायी आणि त्रासाची ठरत असल्याने अनेकांनी शेती करण्याकडे पाठ फिरवल्यामुळे गावातील पडीक क्षेत्रात वाढ होत आहे; मात्र विक्रमगड तालुक्‍यातील शेतकरी त्यावर मात करत यशस्वी शेती करत आहे.

वाहने उभी करण्यावरून दोग गटांत हाणामारी

तालुक्‍यात प्रामुख्याने भातलागवड केली जाते. सिंचनाच्या विशेष सुविधा नसतानाही खरिपात तर भातलागवड होतेच; परंतु उन्हाळी हंगामातही मुँहु खुर्द लघु पाटबंधारा व खांड लघु पाटबंधाऱ्याच्या पाटाच्या पाण्यावर तालुक्‍यातील सजन, झडपोली, खांड, वाकडूपाडा गावात भातपिकाची लागवड करून येथील प्रयोगशील शेतकरी भाताचे उत्पादन घेत आहेत. 

सासू सासऱ्यांकडून त्यांचा होत होता छळ

तालुक्‍यात गेल्या वर्षी अवकाळी पावसाने भातपिकाची पुरती वाट लावली. त्यानंतरही भातपीक तयार होण्याच्या काळात वारंवार झालेल्या पावसाचा भातपिकाला फटका बसला आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे भातपिकाचे 50 उत्पन्न घटल्याने लागवडीचा खर्चही निघाला नाही. पीककर्ज कसे फेडायचे, या चिंतेत असतानाच आपले मनोबल खचू न देता पुन्हा उभारी घेत झडपोली, सजन गावातील शेतकऱ्यांनी न डगमगता उन्हाळी भातशेतीची लागवड केली आहे. 

झडपोली, सजन गावातील प्रयोगशील शेतकरी सेवक सांबरे, अंकुश सांबरे, नरेश सांबरे, शरद सांबरे, श्रीधर सांबरे, सुभाष सांबरे, रमेश सांबरे, नारायण सांबरे, मधुकर सांबरे, पंडित सांबरे अशा अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उन्हाळी हंगामात भाताचे पीक घेतले आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या वर्षानुवर्षे असलेल्या भातलागवडीच्या अनुभवाच्या जोरावर शेतात सुधारित पद्धतीने भातपिकाची रोवणी अंदाजे 25 ते 30 हेक्‍टर क्षेत्रावर केली आहे.

मुँहु खुर्द लघु पाटबंधाऱ्याच्या कालव्याद्वारे सजन, झडपोली गावाकडे येणाऱ्या पाण्याच्या जोरावर 5 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान पेरणी करून आता भातपिकाची रोवणी पूर्ण झाली आहे. भातपिकाचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करून भाताचे अधिकाधिक उत्पादन घेण्याचा त्यांचा मानस आहे. 

स्थानिक जातीची लागवड 
उन्हाळी भातलागवडीसाठी स्थानिक जातींबरोबरच कर्जत 184, कर्जत 3, कर्जत 4, रत्नागिरी, रत्ना, सह्याद्री, पालघर-1 आदी साडेतीन ते चार महिन्यांत तयार होणाऱ्या जातींचा वापर शेतकऱ्यांनी केला आहे. 

विक्रमगड तालुक्‍यात अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे पावसाळी भातपिकाचे मोठे नुकसान झाले असून पीककर्जे कशी फेडायची, ही चिंता शेतकऱ्यांना असते. त्यातून मार्ग काढत मोठ्या हिमतीने आम्ही उन्हाळी भातपिकाची लागवड केली आहे. 
सुभाष सांबरे, उन्हाळी भातपीक लागवड केलेले शेतकरी, सजनगाव 


 

loading image