नाल्यात जिवंत सापडलेल्या बाळास खाजगी रुग्णालयात उपचाराची परवानगी

दिनेश गोगी
बुधवार, 9 जानेवारी 2019

उल्हासनगर - दहा दिवसांपूर्वी अवघ्या एक-दिड तासापूर्वी जन्मलेल्या नवजात बाळाला काळ्या पिशवीत बांधून निर्दयी मातेने नाल्यात फेकल्याची घटना उल्हासनगरात घडली होती. अर्भकाच्या रडण्याचा आवाज आल्यावर समाजसेवक शिवाजी रगडे यांनी अर्भकाला शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आता या बाळाची प्रकृती चिंताजनक बनल्याने बाल न्यायालयाने पोलिसांना खाजगी रुग्णालयातील उपचारासाठी परवानगी दिली आहे.

या बाळाला वाचवण्याकरिता जोही वैद्यकीय खर्च येणार त्याची जबाबदारी शिवाजी रगडे यांनी घेतली आहे. त्याअनुषंगाने आज दुपारी पोलिस-डॉक्टरांच्या उपस्थित या बाळाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वडोलगावाच्या नाल्यात हे नवजात बाळ 30 डिसेंबर रोजी फेकण्यात आले होते. मात्र जन्मताच कापली जाणारी नाळ बाळ रुग्णालयात दाखल केल्यावर कापण्यात आल्याने व नाल्याचे सांडपाणी बाळाच्या नाका-तोंडात गेल्याने त्याच्या कडून उपचारासाठी प्रतिसाद मिळत नाही. त्याच्या नाभी सभोवतालचा अर्थात पोटाचा भाग हिरवट पडला आहे. सदर बालकावर उपचार करण्याकरिता रुग्णालयात सुविधा नसल्याचे अंबरनाथ ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक टी.के.सावंत यांना कळवण्यात आले होते. त्यामुळे सावंत यांनी बाल न्यायालय भिवंडी येथे अर्ज केला. त्यात बालकास खाजगी रुग्णालयात औषधोपचार करणे आवश्यक आहे. 

अंबरनाथ ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.के.चौहान यांनी बाळाचा उपचारासाठीचा ताबा पोलिसांना द्यावा असे पत्र शासकिय रुग्णालयाला दिल्यावर बाळाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आणि शिवाजी रगडे, जयश्री रगडे, पोलीस बी.एम.पाटील, किशोर पेटारे, महिला पोलिस श्वेता गमरे, डॉ.जान्हवी भोसले, डॉ.प्रसन्नजीत जाधव यांच्या उपस्थितीत बाळाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

"महिला पोलिस निभावणार आईची भूमिका"
एखादे नवजात अर्भक जिवंत मिळाल्यावर व त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर महिला पोलिस त्याच्या देखभालीसाठी नियुक्त केल्या जातात. आता बाळाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने दिवसपाळी-रात्रपाळी अशा महिला पोलिस तिथे राहणार असून त्या आईची भूमिका निभावणार आहेत.

Web Title: Permission for the treatment of a child found alive in the gutters in a private hospital