बनावट मतदार ओळखपत्र बनविणाऱ्यास अटक 

बनावट मतदार ओळखपत्र बनविणाऱ्यास अटक 

भिवंडी : झेरॉक्‍स मशीन आणि संगणकाचा वापर करून बनावट मतदार ओळखपत्र बनविणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अनेक ठिकाणी बनावट पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड बनवण्याचे उद्योग भिवंडीत सर्रासपणे सुरू आहेत. गेल्या वर्षीही पोलिसांनी छापा टाकून काही जणांना अटक केली होती. 

आसिफ जीया नियाज अहमद अन्सारी (25) असे बनावट मतदार ओळखपत्र बनविणाऱ्याचे नाव आहे. त्याचे शहरातील कल्याण रोड आजबीबी येथे एनआरसी झेरॉक्‍स सेंटर नावाचे दुकान आहे. या दुकानात सरकारची कोणतीही परवानगी नसताना संगणक व झेरॉक्‍स मशीनचा उपयोग करीत बनावट मतदार ओळखपत्र त्याने बनविले.

तसेच त्यावर स्कॅनर करून नोंदणी अधिकाऱ्यांची सही केली. हे बनावट ओळखपत्र खरे असल्याचे भासवून मतदारांना देत मतदारांची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात अन्सारीविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com