मुंबई : मांजराला ठार करणाऱ्याला दंडाची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

मागील वर्षी एका मांजरीला क्रूरपणे मारुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप असलेल्या चाळीस वर्षीय आरोपीला सत्र न्यायालयाने नुकतीच 9150 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

मुंबई : मागील वर्षी एका मांजरीला क्रूरपणे मारुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप असलेल्या चाळीस वर्षीय आरोपीला सत्र न्यायालयाने नुकतीच 9150 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

चेंबूरमध्ये राहणारा आरोपीने मागील वर्षी मे 2018 मध्ये एका मांजरीला ठार केल्याची फिर्याद आरसीएफ पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. आरोपी संजय गाडेने मांजरीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट इंदिरानगरमध्ये केली होती. मात्र, याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी गुन्हा नोंदवली. प्राण्यांना खोडसाळपणे हानी पोहचवून जीवे मारणे (कलम 428) आणि पुरावे नष्ट करणे (कलम 201) या प्रमुख आरोपांसह प्राणी संरक्षण कायदा आणि मुंबई पोलिस कायद्यानुसार अन्य आरोप ठेवले होते.

आरोपीला महानगर दंडाधिकारी आर एस पाजणकर यांच्यापुढे हजर करण्यात आले होते. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच कोणत्याही दबावाखाली किंवा प्रभावात येऊन गुन्हा कबूल करीत नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. गुन्ह्याची कबुली देत आहे, मला कमीत कमी शिक्षा द्या, अशी विनवणी त्याच्या वतीने करण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाने त्याला 9150 रुपयांच्या दंडाची सजा सुनावली.

आरोपी मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या आजारी आहे, त्यामुळे त्याला कमी शिक्षा देत आहे, असेही न्यायालयाने निकालात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A person gets Punishment for Killed Cat