पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांनो मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करा दंड; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश.. 

police
police
Updated on

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर हल्ला करणाऱ्या चारजणांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

गोवंडीमध्ये शिवाजी नगर भागातील चार जणांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. याचिकेवर न्या भारती डांग्रे यांच्या पुढे शुक्रवारी सुनावणी झाली. लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांना हटकले म्हणून सुमारे पंचवीस तीस जणांनी पोलिसांवर हल्ला केला होता. 

त्यातील काही जणांनी दगडफेक केली आणि पोलिसांचा मास्कही काढण्याचा प्रयत्न केला. शिवाजी नगर पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवून काही जणांना अटक केली होती. त्यापैकी चारजणांनी जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायाधीश भारती डांग्रे यांच्यापुढे जामीनावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सुनावणी झाली. 

पोलिस कोरोना साथीमध्ये स्वतः चा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत आणि जनजीवन सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र आरोपींनी त्यांच्यावरच हल्ला करून त्यांना काम करण्यात अडचणी आणल्या, अशी नाराजी न्यायालयाने व्यक्त केली. चारही आरोपींना दहा हजार रुपयांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला. मात्र प्रत्येकाने मुख्यमंत्री निधीमध्ये पाच हजार रुपये जमा करावे अन्यथा जामीन रद्द होईल, असा दंडही न्यायालयाने सुनावला. 

आरोपीना पोलिसांनी संशयातून पकडले आहे, त्यांचा काही संबंध नाही, असा दावा अर्जदारांच्या वतीने करण्यात आला. मात्र पोलिसांवर हल्ला करणे, अयोग्य आहे असे मत न्यायालयाने व्यक्त केले. राज्य सरकारच्या वतीने जामीनाला विरोध करण्यात आला होता. तसेच दोन अर्जदार कोरोना बाधित होते मात्र आता ते ठीक झाले आहेत असे ही सरकारी वकिलांनी सांगितले.

person who attacked on police have to pay penalty in Mukhyamantri sahyata nidhi 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com