महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीला थेट गुजरातेतून अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

इंस्टाग्रामवरून महिलांचे फोटो काढून त्यांच्या फोटोंचा दुरूपयोग करून महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्या गुजरातमधील एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीला थेट गुजरातेतून अटकेत

मुंबई - इंस्टाग्रामवरून महिलांचे फोटो काढून त्यांच्या फोटोंचा दुरूपयोग करून महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्या गुजरातमधील एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिलांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैसे उकळत असे.

१९ वर्षांचा प्रशांत आदित्य हा गुजरातमधील गांधीनगरचा रहिवासी असून गांधीनगरमध्ये बसून या आरोपीने अनेक महिलांचे जगणे कठीण झाले आहे. फक्त 500 आणि 1000 रुपयांसाठी हा महिलांना ब्लॅकमेल करत असे पण ब्लॅकमेल करण्याची त्याची पद्धत अतिशय घृणास्पद होती. प्रशांत आदित्य हा ब्लॅकमेलिंगचा हा गोरख धंदा चालवायचा.

प्रशांत आदित्यची इन्स्टाग्रामवर अपलोड महिलांचे फोटो काढून त्या फोटोंच्या पार्श्वभूमीत पॉर्न फिल्मचा आवाज अपलोड करायचा. त्यानंतर ते फोटो त्या महिलांना पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या महिलांकडून 500 ते 1000 रुपयांची मागणी करत असत. प्रशांत आदित्य दहावी नापास झाला आहे...पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फसवणूक झालेल्या महिलांचा आकडा 21 एवढा आहे, मात्र प्रशांतच्या चौकशीत त्याने हा आकडा 50 पेक्षा जास्त असल्याचा दावा केला आणि प्रशांतचे हे जाळे एका राज्यात नाही तर संपूर्ण देशात पसरले होते.

महिलांनी ओनलाईन असताना अशा व्यक्तींच्या तावडीत येऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केले असून त्यांच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडल्यास किंवा त्यांच्यासोबत असे घडल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Web Title: Person Who Blackmailed Women Was Arrested Directly From Gujarat Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..