

Loudspeaker on Mosques
ESakal
मुंबई : दिवसातून पाच वेळा प्रार्थनेसाठी (अजान) मशिदींवर भोंगा लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. त्या याचिकेची दखल घेऊन यासंदर्भात उच्च न्यायालयाने किंवा सर्वोच्च न्यायालयाने आधीच काही नियमावली तयार केली आहे. त्याचा अभ्यास करण्याचे आदेश न्यायालयाने मंगळवारी (ता. ९) याचिकाकर्त्यांना दिले.