निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर इंधन दरवाढीचा दणका

मुंबईत पेट्रोलच्या दरात 27 पैसे तर डिझेलच्या दरात 33 पैशांची वाढ
Petrol Diesel Price
Petrol Diesel Price File photo
Summary

मुंबईत पेट्रोलच्या दरात 27 पैसे तर डिझेलच्या दरात 33 पैशांची वाढ

मुंबई: देशातील निवडणुकीच्या (Elections) दरम्यान इंधनाच्या दरांमध्ये घट होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र निवडणुकीचे निकाल (Election Results) घोषित होताच इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. मंगळवारी सुरू झालेली दरवाढ (Fuel Prices) चौथ्या दिवशीही कायम असल्याचे दिसले. शुक्रवारी मुंबईत पेट्रोलच्या (Petrol) दरात 27 पैशांची तर डिझेलच्या (Diesel) दरात 33 पैशांची वाढ दिसून आली. मुंबईत (Mumbai) पेट्रोलचा दर 97.67 रू. तर डिझेलचा दर 88.87 रू. इतका पाहायला मिळाला. (Petrol Diesel Fuel Prices Increasing as Election Results are Out)

Petrol Diesel Price
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवारांचे पत्र, म्हणाले...

पश्चिम बंगाल राज्यासह एकूण पाच राज्याच्या निवडणुकीचे निकाल पार पडताच मंगळवार पासून सातत्याने इंधनाची दरवाढ होत आहे. मुंबईत चार दिवसांमध्ये पेट्रोल 86 पैशाने वाढले आहे तर डिझेल 1.8 रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे महामारीच्या काळात सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे. इंधनाची दरवाढ अशीच कायम राहिल्यास लवकरच शंभरी पार होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी देशातील निवडक महानगरातील इंधनाचे दर बघता सर्वाधिक दर मुंबईतील आहे. यामध्ये मुंबईत पेट्रोल 97.67 रुपये प्रति लिटर आहे. तर त्याचप्रमाणे चंदीगड 87.86, बंगळुरू 94.36, दिल्ली 91.33, चेन्नई 93.2, कोलकत्ता 91.47 रुपये प्रति लिटर दर आहे.

Petrol Diesel Price
Share Market: सेन्सेक्सचा आलेख वर; 49 हजारांपार मजल

विविध इंधन कंपन्यांच्या दरवाढीत फरक

शुक्रवारी वाढलेल्या इंधन दरवाढीत विविध इंधन कंपन्यांचे वेगवेगळी दरवाढ दिसून आली यामध्ये रिलायन्स पेट्रोल 68 पैसे, इंडियन ऑइल पेट्रोल 27 पैसे आणि एचपी पेट्रोल 27 पैशांची दरवाढ झाली आहे. तर डिझेलची दरवाढ तिन्ही कंपन्यांची सारखीच म्हणजे 33 पैशांची वाढ दिसून आली आहे.

नांदेड जिल्ह्यात पेट्रोलचा भडका

राज्यभरात शुक्रवारी नांदेड सर्वाधिक महाग पेट्रोल आहे. नांदेड मध्ये 99.57 रुपये त्याप्रमाणेच परभणी 99.25, बीड 99.21, अमरावती 99.13, सिंधुदुर्ग 99.12 रुपये दर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com