'म्हणून' तुमचे पैसे वाचतायत; कोरोनाचा जगावर असाही परिणाम...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

चीनमध्ये आणि जगभरात महाभयंकर कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजवाय. एकट्या चीनमध्ये २५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावलाय (सदर आकडेवारी अधिकृत नाही, ही माहिती लीक झालीये). अशातच या महाभयंकर व्हायरसमुळे त्याचा जागतिक व्यापारावर देखील परिणाम आता जाणवताना दिसतोय. 

मुंबई - चीनमध्ये आणि जगभरातच महाभयंकर कोरोना व्हायरसने हाहाकार माजवाय. एकट्या चीनमध्ये २५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावलाय (सदर आकडेवारी अधिकृत नाही, ही माहिती लीक झालीये). अशातच या महाभयंकर व्हायरसमुळे त्याचा जागतिक व्यापारावर देखील परिणाम आता जाणवताना दिसतोय. 

मोठी बातमी - हिंगणघाटातील पीडितेच्या मृत्यूनंतर अजित पवार 'शिक्षेबद्दल' म्हणालेत..

चीनमधून पसरलेल्या महाभयंकर कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमती पडलेल्या पाहायला मिळतायत. चीन हा मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करत असतो. अशात आता क्रूड ऑईलच्या किमती कमी झाल्याने भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसात तब्ब्ल तीन रुपयांनी कमी झाले आहेत. येत्या काही दिवसात पेट्रोलचे भाव आणखीन कमी होतील असं जाणकारांकडून सांगितलं जातंय.  

काल म्हणजेच सोमवारी मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ७७.७६ रुपये होतं तर डिझेल प्रतिलिटर ६८.१९ रुपये होतं. साधारण महिनाभरापासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये घसरण होत असल्याचं नोंदवलं गेलंय. 

मोठी बातमी - दाऊदचा विश्वासू आणि कुख्यात गुंड तारीक परवीनला अटक!

दरम्यान पेट्रोलियम पदार्थ देखील GST अर्थात वस्तू आणि सेवा करांमध्ये आणावेत अशी मागणी गेल्या काही काळापासून केली जातेय. अशात यासंदर्भातील निर्णय हा GST काउंसिल बैठकीतच घेतला जाऊ शकतो. यावर बोलताना भारताच्या अंतर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणालात, याबाबतचा निर्णय सर्वस्वी राज्यांवर अवलंबून आहे. सर्व राज्यांनी आणि GST काउंसिल याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकेल. 

petrol diesel rates dropped due effect of coronavirus on global market


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: petrol diesel rates dropped due effect of coronavirus on global market